सांगोला (प्रतिनिधी) : इयत्ता पहिलीमध्ये शिक्षण घेत असलेली कु. निरंजना चंद्रकांत पुजारी हिने अतिशय लहान वयात उल्लेखनीय कामगिरी करत कोल्हापूर जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य टॅलेंट सर्च प्रज्ञाशोध परीक्षेत तिसरा क्रमांक पटकावला आहे. तिच्या या यशामुळे सांगोला तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

निरंजना ही सांगोला येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी यांची कन्या असून लहान वयातच तिने अभ्यासातील प्रामाणिकपणा, चिकाटी आणि जिद्द यांचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे.

महाराष्ट्र राज्य टॅलेंट सर्च प्रज्ञाशोधपरीक्षा ही विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा कस पाहणारी प्रतिष्ठेची परीक्षा मानली जाते. अशा स्पर्धात्मक परीक्षेत निरंजनाने मिळवलेले यश हे तिच्या मेहनतीचे आणि पालक व शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे फलित असल्याचे मानले जात आहे.

तिच्या या यशाबद्दल सांगोला तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, शैक्षणिक संस्था, तसेच नागरिकांकडून तिचे कौतुक करण्यात येत आहे. “अतिशय कमी वयात एवढे मोठे यश मिळवणे ही अभिमानाची बाब असून भविष्यातही ती अशीच यशाची शिखरे सर करेल,” अशा शुभेच्छा नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

निरंजनाच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत असून, तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



