महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपुलकीचे कार्य प्रशासनीय- पत्रकार भारत कदम
सांगोला ( प्रतिनिधी)- आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने शहर व तालुक्यातील ५ गरजू महिलांना उपजीविकेची साधने वाटप करण्यात आली.

रविवारी आपुलकी प्रतिष्ठान कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात दै. पुढारीचे तालुका प्रतिनिधी भारत कदम, दै. सुराज्यचे तालुका प्रतिनिधी निसार तांबोळी व उद्योजक राजेंद्र बिरगे या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मेडशिंगी येथील निर्मला मोरे, शालन अवघडे, सांगोला येथील माया इंगोले यांना उपजीविकेसाठी शेळी, पुष्पा पारसे यांना शिलाई मशीन तर वाटंबरे येथील उज्वला पवार यांना पिठाची गिरणी उपजीविकेसाठी भेट देण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना पत्रकार भारत कदम म्हणाले की, आपुलकी प्रतिष्ठान एकल महिलांना स्वतःच्या पायावर उभे करून त्यांच्या प्रपंचाला हातभार लावण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. ज्या महिलांचा कुटुंब प्रमुख गमावला आहे, अशा महिलांना मोलाची मदत करून त्यांच्या दुःख काही अंशी कमी करण्याचे प्रयत्न आपुलकी प्रतिष्ठानकडून सातत्याने होत आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपुलकी प्रतिष्ठान करत असलेले कार्य नक्कीच प्रशंसनीय असे आहे.

प्रतिष्ठानचे कार्य जिल्हाभर नव्हे तर महाराष्ट्रभर पोचले असून आपुलकीच्या या कार्याचे अनुकरण इतर ठिकाणीही केले जात आहे, ही बाब अभिनंदनीय अशी आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष राजेंद्र यादव यांनी केले. कार्यक्रमाला आपुलकी प्रतिष्ठानचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



