सांगोला नगरपरिषद उपनगराध्यक्षपदी नितीन विठ्ठल इंगोले यांची बिनविरोध निवड

0

 नामनिर्देशित सदस्यपदी विजय वसंत इंगोले व तनुजा बाळासाहेब एरंडे यांचे नामनिर्देशन

     सांगोला (प्रतिनिधी) आज दि‌. १३ जानेवारी रोजी सांगोला नगरपरिषद उपाध्यक्षपदी निवड व नामनिर्देशित सदस्यांचे नामनिर्देशन करणेकामी नवनिर्वाचित सदस्यांची पहिली सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष तथा पिठासीन अधिकारी श्री. आनंदाभाऊ माने यांच्या अध्यक्षतेखाली राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह येथे संपन्न झाली. उपनगराध्यक्षपदासाठी शिवसेना पक्षामार्फत श्री. नितीन विठ्ठल इंगोले यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले‌. सदर नामनिर्देशनपत्राची छाननी पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष यांनी केली व सदर नामनिर्देशनपत्र वैध असल्याचे जाहीर केले. तसेच उपाध्यक्ष पदासाठी केवळ एकच नामनिर्देशनपत्र दाखल झाले असल्याने उपाध्यक्षपदी श्री‌. नितीन विठ्ठल इंगोले यांची बिनविरोध निवड झाल्याचे पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष यांनी घोषित केले.

यासोबतच नामनिर्देशित सदस्यांचे नामनिर्देशनासाठी मान्यताप्राप्त पक्ष व नोंदणीकृत आघाडीच्या तौलनिक संख्याबळाच्या प्रमाणात नामनिर्देशन दाखल करण्याची तरतूद असल्याने शिवसेना पक्षामार्फत नामनिर्देशित सदस्यपदासाठी श्री. विजय वसंत इंगोले व सांगोला शहर विकास आघाडीमार्फत नामनिर्देशित सदस्यपदासाठी श्रीमती तनुजा बाळासाहेब एरंडे यांचे नामनिर्देशनपत्र जिल्हाधिकारी कार्यालय येथे विहित वेळेत सादर करण्यात आले होते. सदर दोन्ही नामनिर्देशनपत्र वैध असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले असल्याने श्री. विजय वसंत इंगोले व श्रीमती तनुजा बाळासाहेब एरंडे यांची नामनिर्देशित सदस्यपदी नियुक्ती झाली असल्याचे पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष यांनी घोषित केले.

यावेळी पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष श्री. आनंदाभाऊ माने, मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी, सर्व नगरसेवक यांनी नवनिर्वाचित उपाध्यक्ष व नवनियुक्त नामनिर्देशित सदस्य यांचे अभिनंदन केले. यावेळेस राजकीय क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार बांधव, शहरातील नागरिक, नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here