इंधन बचत, परकीय चलन बचतीकरिता रेल्वे सेवा वाढवाव्यात :– अशोक कामटे संघटना

0

सांगोला (प्रतिनिधी): कोल्हापूर –मिरज – पंढरपूर– कुर्डूवाडी- लातूर मार्गावर रेल्वे सेवा वाढवणेकरिता शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संघटनेचे सदस्य हरी बाबर यांनी मुंबई येथे निवेदन दिले.

आज भारतीय रुपयाचे डॉलरच्या तुलनेतील मूल्य सतत घसरत असून देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. परकीय इंधनावरील वाढते अवलंबित्व, पेट्रोल-डिझेल आयातीवरील प्रचंड खर्च आणि वाढती वाहतूक समस्या यामुळे देशाची आर्थिक गंगाजळी मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे.

देशाचे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीसाहेब यांनी देखील इंधन बचतीसाठी संपूर्ण देशवासियांना आवाहन केले असून मुख्यमंत्री देखील मंत्रालयात दुचाकीने प्रवास करून इंधन बचतीचा आदर्श निर्माण करत आहात, ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. त्या बरोबरच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सेवा वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे.

 

मात्र दुसऱ्या बाजूला कोल्हापूर ,मिरज , सांगली,कवठेमहांकाळ, ढालगाव, सांगोला, पंढरपूर भागातून तसेच इतर जिल्ह्यांदरम्यान दररोज हजारो खाजगी वाहने, ट्रॅव्हल्स, दुचाकी व चारचाकी वाहनांमधून लाखो लिटर पेट्रोल व डिझेल खर्च होत आहे. या इंधनासाठी देशातील कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन परदेशात जात आहे. ही परिस्थिती भविष्यात देशाच्या आर्थिक स्थैर्यासाठी धोकादायक ठरू शकते.

त्याचवेळी “शक्तीपीठ महामार्ग” सारख्या प्रकल्पासाठी लाखो कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. परंतु महामार्ग उभारल्यानंतर देखील भविष्यात त्याच मार्गावर अधिकाधिक परकीय इंधनावर चालणारी वाहने धावणार आहेत. त्यामुळे फक्त रस्ते विकास हा दीर्घकालीन शाश्वत उपाय होऊ शकत नाही.

त्याऐवजी पुढील सर्वच महत्त्वाचे रेल्वे मार्गावर तात्काळ प्राधान्याने रेल्वे सेवा गाड्या वाढवल्यावर इतर खाजगी वाहतुकीवर निर्बंध येऊ शकतील. प्रयायाने नागरिक स्वतःच्या वाहनांएवजी रेल्वे सेवेचा वापर करतील . त्याकरिता

11027 दादर –सातारा– दादर रेल्वे दररोज करावी, सांगोला– पंढरपूर– शेगाव (गजानन महाराज मंदिर) रेल्वे , कोल्हापूर –कलबुर्गी कोल्हापुरातून दररोज सकाळी आठ वाजता नवीन रेल्वे सुरू करण्यात यावी, साप्ताहिक पंढरपूर –तिरुपती रेल्वेचा विस्तार मिरज/कोल्हापूर पर्यंत करण्यात यावा, मिरज –कुर्डूवाडी लोहमार्गचे दुहेरीकरन तत्काळ मंजूर करून काम सुरू करण्यात यावे, पंढरपूर –दिल्ली साप्ताहिक रेल्वे सुरू करावी, बंद करण्यात आलेली किसान रेल्वे सांगोला स्थानकातून पूर्ववत करावी.

वरील रेल्वे सेवा , दुहेरीकरण नियोजन जलद गतीने करून पुढील कालावधीत प्रत्यक्षात आणल्यास संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, कोकण , मराठवाडा, विदर्भ व सीमाभागाचा मोठ्या प्रमाणात आर्थिक, औद्योगिक, पर्यटन व सामाजिक विकास होईल. तसेच लाखो नागरिकांना सुरक्षित, स्वस्त आणि पर्यावरणपूरक प्रवास, शेतकऱ्यांच्या भाजीपाला व माल सुविधा रेल्वे द्वारे पोचविणे अल्प दरात सुलभ होतील.

रेल्वे वाहतूक वाढल्यास पेट्रोल व डिझेलवरील अवलंबित्व कमी होईल,परकीय चलनाची मोठ्या प्रमाणात बचत होईल,रस्ते अपघात कमी होतील,पर्यावरण प्रदूषण कमी होईल,ग्रामीण व सीमाभागातील विकासाला मोठी चालना मिळेल,उद्योग, पर्यटन व रोजगार निर्मिती वाढेल,त्यामुळे फक्त “पेट्रोल वाचवा” असे आवाहन करण्यापेक्षा केंद्र व राज्य शासनाने संयुक्तपणे रेल्वे व जलमार्गासारख्या शाश्वत वाहतूक सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक आहे.सामान्य जनतेच्या हितासाठी व देशाच्या आर्थिक भविष्यासाठी आपण या मागणीचा सकारात्मक विचार करून तात्काळ केंद्र शासन, रेल्वे मंत्रालय व संबंधित विभागांशी समन्वय साधून योग्य ती कार्यवाही करावी.

अन्यथा शासन फक्त कंत्राटदार व उद्योगपती यांच्याच हितासाठी कार्यरत असून सामान्य जनतेच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करत आहे, अशी भावना जनमानसात निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आले आहे. यावेळी अशोक कामटे संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

गत अधिक मासानिमित्त व पुढील महिन्यात भरणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे लाखो भाविक वाहनाने प्रवास करून पंढरपूर येथे येतील, यावर खाजगी वाहनाचा वापर कमी,टाळण्याकरिता मुख्यमंत्री महोदयांनी,रेल्वे प्रशासनाने मोठ्या प्रमाणात कायमस्वरूपी मिरज –पंढरपूर –पुणे,कोल्हापूर –कलबुर्गी मार्गावर प्रत्येकी 4 तासाला रेल्वे गाड्या सुरू कराव्यात अशी मागणी संघटनेने केली आहे.

निलकंठ शिंदे सर अध्यक्ष:–अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटना सांगोला

 

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here