रयतच्या प्राध्यापकाचा अनोखा उपक्रम; बंधूच्या पुण्यतिथीनिमित्त वृद्धाश्रमात अन्नदान

0

पंढरपूर (प्रतिनिधी): रयत शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय माढा येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दत्तात्रय काळेल यांनी त्यांचे लहान बंधू स्व. युवराज काळेल यांच्या बाराव्या पुण्यतिथीनिमित्त

सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पुण्यतिथी चा कार्यक्रम ह.भ.प. बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली निराधार गरीब व गरजू लोकांसाठी स्थापन केलेल्या पंढरपूर येथील गोपाळपूर येथे मातोश्री वृद्धाश्रमामध्ये पुण्यतिथी चा कार्यक्रम आयोजित केला होता.

कार्यक्रमानंतर गोड जेवणाचे सर्वांना नियोजन केले होते. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक श्री. धनंजय राक्षे, माढा महाविद्यालयाचे कार्यालयीन प्रमुख श्री .हणमंत खपाले श्री. मारुती काळेल प्रा.डॉ. दत्तात्रय काळेल सोलापूर शहर पोलीस कॉन्स्टेबल श्री. नवनाथ काळेल व श्री. आप्पासो गळवे सर व काळेल परिवारातील सदस्य उपस्थित होते.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here