कमलापूर जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी ‘डॉ. सी.व्ही. रमन’ राज्यस्तरीय परीक्षेत तालुक्यात अव्वल; ‘इस्रो’ (ISRO) अभ्यास सहलीसाठी निवड!

0

सांगोला (प्रतिनिधी): कमलापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या जोरावर राज्य पातळीवर सांगोला तालुक्याचा डंका वाजवला आहे. जनसेवा प्रतिष्ठान, अहिल्यानगर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि आव्हानात्मक ‘राज्यस्तरीय डॉ. सी.व्ही. रमन बालवैज्ञानिक परीक्षेत शाळेच्या तीन विद्यार्थ्यांनी तालुका गुणवत्ता यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. या दैदिप्यमान यशामुळे या विद्यार्थ्यांची थेट ‘विशेष विज्ञान कार्यशाळा आणि इस्रो (ISRO) अभ्यास सहलीसाठी थेट निवड झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या उत्तुंग यशामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांची आवड वाढवण्यासाठी आणि त्यांच्यातील सुप्त वैज्ञानिक गुणांना वाव देण्यासाठी ही परीक्षा राज्यभरात अत्यंत काठिण्य पातळीची मानली जाते. अशा या आव्हानात्मक परीक्षेत कमलापूर गावच्या खालील तीन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले यामध्ये कु. पांढरे आरती पोपट (इयत्ता ७ वी)हिने तालुका गुणवत्ता यादीत ३ रा क्रमांक पटकावला.कु. खटके अंकिता अनिल (इयत्ता ७ वी) तालुका गुणवत्ता यादीत ४ था क्रमांक मिळवला आणि चि. ढोले रुशांत सचिन (इयत्ता ५ वी) याने तालुका गुणवत्ता यादीत ५ वा क्रमांक मिळवला .

या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या या तीनही बालवैज्ञानिकांना जनसेवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित एका विशेष विज्ञान कार्यशाळेत सहभागी होता येणार आहे, जिथे त्यांना नामवंत शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभेल.

परंतु, या संपूर्ण परीक्षेचे सर्वात मोठे आकर्षण आणि सर्वोच्च पारितोषिक म्हणजे भारताची जगप्रसिद्ध अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ (Indian Space Research Organisation) ला थेट भेट देण्याची सुवर्णसंधी! या विद्यार्थ्यांना ‘इस्रो’च्या केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन तिथली रॉकेट्स, उपग्रह निर्मिती आणि अंतराळ मोहीम जवळून अनुभवता येणार आहे. ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना मिळालेली ही संधी त्यांच्या भविष्यातील वैज्ञानिक करिअरसाठी मैलाचा दगड ठरणार आहे.

कमलापूरच्या या बालवैज्ञानिकांच्या ऐतिहासिक यशाबद्दल सांगोला तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, आणि केंद्रप्रमुखांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

तसेच कमलापूर गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्य आणि समस्त ग्रामस्थांनी या गुणवंत बालवैज्ञानिकांचा व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन करुन त्यांच्या पुढील ‘इस्रो’ प्रवासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here