कुर्डूवाडीतून कोल्हापूरकडे दुपारनंतर दररोज 19 तास रेल्वे नाही तरीही रेल्वे प्रशासन उदासीन ??
सांगोला ( प्रतिनिधी): रेल्वे क्रमांक 71421 व 71422 मिरज– कुर्डूवाडी रेल्वेचा विस्तार कोल्हापूर –सोलापूर –कलबुर्गीपर्यंत करण्यात यावा अशी मागणी मध्य रेल्वे मुंबई विभागाचे महाव्यवस्थापक यांच्याकडे निवेदनाद्वारे शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

रेल्वे क्रमांक 71421 व 71422 रेल्वे मिरज– कुर्डूवाडी दरम्यान नियमित्त धावते ,पण कुर्डूवाडीतून रेल्वे परतीच्या प्रवासाकरिता धावत असल्याने अनेकांना जिल्ह्याच्या कामाकरिता सोलापूरला जावे लागते पण कुर्डूवाडीत सदर रेल्वे सकाळी 9:45 च्या सुमारास पोहचल्यानंतर 3 ते 4 तासानंतर सोलापूरसाठी रेल्वे आहे त्यामुळे कुर्डूवाडीपर्यंतचा प्रवास असून अडचण ,नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

त्यामुळे सदरील रेल्वे सेवेचा विस्तार सोलापूर, कलबुर्गी जंक्शनपर्यंत करणे गरजेचे आहे तसेच ही मेमो रेल्वे मिरज येथून सोडण्याऐवजी थेट छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून दररोज सकाळी सहा वाजता सुरू करण्यात यावी त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांना थेट सोलापूर ,कोल्हापूर येथेही पोहोचता येईल त्यामुळे सोलापूर, सांगली ,कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळ ,उद्योग व्यवसाय वाढून आर्थिक विकासाला चालना मिळून रोजगाराच्या संधी वाढू शकतात या रेल्वेचा कलबुर्गी पर्यंत विस्तार केल्यास तीर्थक्षेत्र गाणगापूर ,अक्कलकोट व सोलापूर हे महत्त्वाची शहरे या मिरज– कुर्डूवाडी रेल्वेचा विस्तार केल्यानंतर जोडली जाणार आहेत.

सध्या ही रेल्वे कुर्डूवाडी–मिरज पर्यंत धावत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे दोन्ही दिशेला प्रवाशाना अर्धवट प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे मिरज –कुर्डूवाडी रेल्वेचा विस्तार कोल्हापूर– कुर्डूवाडी– सोलापूर– कलबुर्गीपर्यंत सर्व थांबे घेऊन आवश्यक आहे. परिणामी रेल्वेचे उत्पन्न वाढून प्रवाशांची सोय होणार आहे. या निवेदनाच्या प्रती शहीद अशोक कामटे संघटनेने विभागीय. रेल्वे व्यवस्थापक पुणे, सोलापूर व कोल्हापूर सांगली सोलापूर जिल्ह्यातील सर्व खासदारांना पाठपुरावा करण्याकरिता दिलेल्या आहेत. यावेळी अशोक कामटे संघटनेचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

कुर्डूवाडी जंक्शनहून पंढरपूर, सांगोला,मिरज व कोल्हापूरकडे जाण्याकरिता प्रवाशांना दुपारी 1.30 नंतर किमान 19 तास रेल्वे सेवा उपलब्ध नाही हा वेळेचा मोठा गॅप आहे प्रवाशांची त्यामुळे मोठी गैरसोय होत आहे त्याकरिता या मिरज– कुर्डूवाडी रेल्वेचा विस्तार केल्यास सोलापुरातून दररोज दुपारी 3 वाजता या रेल्वेचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो याकरिता अशोक कामटे संघटना रेल्वे विभागाकडे पाठपुरावा करीत आहे.
निलकंठ शिंदे सर ,अध्यक्ष:– अशोक कामटे संघटना सांगोला

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



