वाघमारे सरांच्या कराटे क्लासचे यश; राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये सांगोल्याच्या तीन मुलांची निवड

0

सांगोला (प्रतिनिधी): दि.17 व 18 रोजी अहिल्यानगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धे करता सांगोल्यातील तीन मुलांची निवड करण्यात आलेली आहे.सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मान्यता प्राप्त कराटे संघटना स्पोर्ट्स कराटे डो असोसिएशन सोलापूर यांच्यामार्फत ही निवड करण्यात आलेले आहे.यामध्ये सांगोल्यातील आशिष कोकरे, सुरज पांढरे व मयंक स्वामी यांची निवड करण्यात आलेली आहे.

त्यांना श्रावणी वाघमारे व निजेंद्र चौधरी यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे यशस्वी स्पर्धकांना सोलापूर जिल्ह्याचे स्पोर्ट्स कराटे डॉ असोसिएशन सोलापूर चे अध्यक्ष जी के वाघमारे सर व कराटे डू असोसिएशन ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्राचे सचिव श्री संदीप गाडे सर संदीप वाघचौरे सर सुनील वाघमारे यांनी अभिनंदन केले.

यशस्वी विद्यार्थी हे वाघमारे सरांच्या कराटे क्लासमध्ये रोज सातत्याने सराव करीत आहेत त्यांच्या या निवडीबद्दल संपूर्ण क्रीडा क्षेत्रात व कलाक्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here