“समाज जडणघडणीसाठी शिक्षकांचे अमूल्य योगदान”: श्री. रामदास भाजीभाकरे

0

माढा :रयत शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय, माढा येथे स्टाफ वेल्फेअर समितीच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त “शिक्षक सन्मान सोहळा” मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. सुनील हेळकर यांनी भूषविले, तर श्री. रामदास भाजीभाकरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शिक्षकांचा सन्मान करून त्यांना पुष्पगुच्छ व ग्रंथ भेट देण्यात आला. पाहुण्यांनी आपल्या मनोगतात समाजजीवनातील शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित करताना विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी तसेच आदर्श व्यक्तिमत्त्व निर्माण करण्यात शिक्षकांचे अमूल्य योगदान असल्याचे प्रतिपादन केले. प्राचार्य डॉ. सुनील हेळकर यांनी शिक्षक दिनाचे महत्व स्पष्ट केले. “शिक्षकांनी केवळ ज्ञानदान न करता संस्कारदानाची जबाबदारीही पार पाडावी,” असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रविराज कांबळे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. अशोक लोंढे यांनी करून दिला, तर आभार प्रदर्शन प्रा. अमोल मोरे यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here