कोल्हापूर – कलबुर्गी विशेष रेल्वेला पाच ठिकाणी थांबे मंजूर; शहीद अशोक कामटे संघटनेच्या मागणीला यश

0

सांगोला ( प्रतिनिधी): दिवाळीच्या गर्दीच्या हंगामात प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या कोल्हापूर- कलबुर्गी विशेष रेल्वेला मार्गावरील पाच ‘महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्याची शहीद अशोक कामटे संघटनेची मागणी रेल्वे प्रशासनाकडून अखेर मान्य झाली आहे. माढा, मोहोळ, अक्कलकोट रोड, दुधनी आणि गाणगापूर रोड या स्थानकांवर थांबे मंजूर झाल्याने या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. अशोक कामटे संघटनेने यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.

दसरा आणि दिवाळीच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर – कलबुरगी- कोल्हापूर (गाडी क्रमांक ०१४५१/०१४५२) ही विशेष रेल्वे १० ऑक्टोबर पासून चालविण्यात येत आहे. या गाडीमुळे पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील प्रवाशांना थेट रेल्वेसेवेचा लाभ मिळणार आहे. मात्र, सुरुवातीच्या वेळापत्रकात कुर्डूवाडीनंतर सोलापूर आणि त्यानंतर थेट कलबुरगी येथेच थांबे असल्याने मधल्या मार्गावरील प्रवाशांची गैरसोय होत होती.

या पार्श्वभूमीवर अशोक कामटे सामाजिक संघटनेने रेल्वे प्रशासनाकडे या स्थानकांवर थांबे देण्याची मागणी केली होती. अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. त्याचप्रमाणे कर्नाटकातील गाणगापूर येथे श्री दत्तात्रेयांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक जातात. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये या दोन्ही तीर्थक्षेत्रांकडे जाणाऱ्या भाविकांची गर्दी वाढते. अक्कलकोट रोड आणि गाणगापूर रोड येथे थांबे मंजूर झाल्यामुळे भाविकांना प्रवास करणे अधिक सोयीचे होणार आहे. याशिवाय माढा, मोहोळ आणि दुधनी परिसरातील प्रवाशांनाही या विशेष रेल्वेचा लाभ घेता येणार आहे. संघटनेच्या सततच्या पाठपुरामुळे थांबा मंजूर झाल्याचे अशोक कामटे संघटनेच्यावतीने सांगण्यात आले, से रेल्वे प्रशासनाने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे या संघटनेेच्या कार्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here