पंढरपूरमधून ‘सोशल सैनिक महासंघटन दौरा व संवाद मेळाव्या’चा शुभारंभ!

0

प्रतीक दादा शर्मा यांच्या उपस्थितीत शिवसेना सोशल मीडिया सोलापूर विभागाची जिल्हा आढावा बैठक; अमित पाटील यांच्या पुढाकाराने २६१ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

सांगोला (प्रतिनिधी): शिवसेना सोशल मीडिया महाराष्ट्र राज्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सोशल सैनिक महासंघटन दौरा व संवाद मेळावा’ या उपक्रमाचा शुभारंभ पंढरपूर येथून शिवसेना सोशल मीडिया उपराज्यप्रमुख मा. प्रतीक दादा शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. यानिमित्ताने शिवसेना सोशल मीडिया सोलापूर विभागाची जिल्हा आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत संघटनात्मक कामाचा आढावा घेण्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला.

या बैठकीत शिवसेना सोशल मीडिया उपराज्यप्रमुख मा. प्रतीक दादा शर्मा यांनी सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत सोशल मीडिया विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. पक्षाची विचारधारा, पक्षाची भूमिका, लोकहिताची कामे आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती समाजमाध्यमांच्या माध्यमातून प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तसेच डिजिटल माध्यमांमध्ये शिवसेनेची भूमिका अधिक सक्षमपणे मांडण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करावे, असे आवाहन केले.

शिवसेना सोशल मीडिया सोलापूर जिल्ह्यात संघटनात्मक विस्ताराला गती मिळत असून, जिल्हा संपर्कप्रमुख अमित पाटील यांच्या पुढाकाराने आतापर्यंत तब्बल २६१ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यापासून तालुका, शहर, जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण स्तरापर्यंत संघटनेची बांधणी करण्यावर भर देण्यात येत आहे. या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शिवसेनेची विचारधारा, जनहिताची भूमिका, पक्षाचे विविध उपक्रम आणि लोकाभिमुख कार्य समाजमाध्यमांद्वारे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू आहे.

आगामी काळात संघटनेचा विस्तार अधिक व्यापक करण्यासोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाचे कार्य तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे, स्थानिक प्रश्नांना वाचा फोडणे आणि जनतेशी प्रभावी संवाद साधणे यावर विशेष भर दिला जाणार आहे. ‘सोशल सैनिक महासंघटन दौरा व संवाद मेळावा’ हा उपक्रम पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढविण्यासह संघटनात्मक कार्याला नवी दिशा देणारा ठरणार असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

या बैठकीस नगराध्यक्षा प्रणिता भालके, नगराध्यक्ष आनंदा माने, जिल्हाप्रमुख चरणराज चौरे, दिग्विजय शहाजीबापू पाटील, शिवाजी सावंत, शिवाजी बाबर, महादेव सलवदे, आशिष पढायार, यश रणभोर, यश जाधव, सागर गोडसे महादेव चुंगी उत्कर्ष पाटील विशाल पाटमस सौरभ कदम सुहास सराटे विजय मोटे अभय मोटे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

पंढरपूर येथून सुरू झालेल्या या महासंघटन दौऱ्याच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना सोशल मीडिया संघटना अधिक मजबूत करण्यासह डिजिटल माध्यमांवर पक्षाची प्रभावी उपस्थिती निर्माण करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here