सांगोला (प्रतिनिधी): सांगोल्यातील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.

संघटनेच्या स्टेशन रोड येथील तोरणा मुख्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व मा. पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन उपाध्यक्ष मकरंद पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलकंठ शिंदे सर यांनी केले. यावेळी या थोर राष्ट्रपुरुषास जयंतीनिमित्त शहरातील नागरिकांनी, उपस्थितीत सदस्यांनी आदरांजली अर्पण केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले. आभार अनिल तारळकर यांनी मानले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक


