कडलास (प्रतिनिधी): कडलास ग्रामपंचायतीत आदी सेवा धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत ग्रामसभा मोठ्या उत्साहात पार पडली.
शहीद बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस उपसरपंच रूपालीताई साळुंखे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सभेस सुरुवात झाली.ग्रामस्थांचा मोठा सहभाग यामध्ये होता. समाजाच्या समस्यांवर मोकळेपणाने चर्चा करण्यात आली तसेच अडीअडचणींवर उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

यावेळी माजी उपसरपंच बंडू लवटे, माजी उपसरपंच विजय ननवरे, माजी उपसरपंच समाधान पवार, गजेंद्र ननवरे, अंकुश ननवरे, डॉक्टर रामहरी ननवरे,युवा नेते प्रशांत साळुंखे, युवा नेते निलेश अनुसे, पोलीस पाटील रघुनाथ ननवरे सामाजिक कार्यकर्ते अशोक ठोकळे ग्रामपंचायत अधिकारी मुलाणी भाऊसाहेब ग्रामपंचायत चे सर्व कर्मचारी कोळी समाजाचे ग्रामस्थ व महिलावर्ग आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार नितीन दादा गव्हाणे (माजी उपसरपंच तथा सूतगिरणीचे व्हाइस चेअरमन) यांनी मानले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक


