प्रतिनिधी (शशिकांत कोळी): दरवर्षी प्रमाणे शिवप्रेमी गणेश तरुण मंडळ घेरडी च्या वतीने मुलांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी दिवाळी निमित्त किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

प्रथम क्रमांक 1501 रुपये व ट्रॉफी.श्रीनिवास करे ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने हे बक्षीस ठेवण्यात आले, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस1101 रुपये व ट्रॉफी. रामचंद्र बुरुंगले सर यांच्या वतीने हे बक्षीस ठेवण्यात आले, तृतीय क्रमांकाचे बक्षीस 701 रुपये व ट्रॉफी प्राथमिक शिक्षक सचिन पोळ यांच्यावतीने ठेवण्यात आले, उत्तेजनार्थ 501रुपये व ट्रॉफी. इंजिनिअर अजित नवाळे यांच्यावतीने ठेवण्यात आले. तसेच स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांसाठी प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहेत. प्रशस्तीपत्रकासाठी अक्षय पोळ, तर ट्रॉफीसाठी युवा उद्योजक धर्मेंद्र (पपु) कांबळे यांचे विशेष सहकार्य लाभलेले आहे.

हया किल्ला बनवा स्पर्धेचे परीक्षण 22 ऑक्टोंबर 2025 रोजी होणार आहे व बक्षीस वितरण 24 ऑक्टोंबर 2025 रोजी ठेवण्यात आले आहे.
किल्ला बनवा स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी आकारण्यात आलेली नसून स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी आदित्य पोळ व इंजिनिअर अजित नवाळे यांच्याकडे नोंदवावीत तसेच परीक्षण दिवशी स्पर्धकांनी सकाळी आठ वाजल्यापासून आपापल्या किल्ल्याजवळ थांबावे असे आयोजकाचे वतीने आवाहन करण्यात आले आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



