सांगोला (प्रतिनिधी): अनाथांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणं हीच खरी दिवाळी, सामाजिक बांधिलकी जपणं हेच आपल्या सणाचं खरं सौंदर्य…. या सणाला आनंद वाटण्यासाठी सांगोला विद्यामंदिर शिक्षक वर्ग व परिवर्तन फाऊंडेशन सांगोला यांचे तर्फे पंढरपूर येथील वा. बा. नवरंगे बालकाश्रमास दिवाळी निमित्त भेट व भेटवस्तू देऊन दिवाळी साजरी करण्यात आली.

14 वर्षापासुन श्री. नागेश भोसले सर यांनी सुरू केलेल्या या उपक्रमात दर दिवाळीला सांगोला विद्यामंदिरचे अनेक शिक्षक व आजी-माजी विद्यार्थी स्वेच्छेने बालकाश्रमास भेट व मदत देतात. यामध्ये तेथील मुला मुलींना दैनंदिन जीवनासाठी व शिक्षणासाठी लागणारे साहित्य दिले जाते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रविवार दि. 19 ऑक्टोबर 2025 रोजी पंढरपूर येथील वा. बा. नवरंगे बालकाश्रमास भेट देण्यात आली. आश्रमामध्ये लहान मोठी अशी ४५ मुले-मुली आहेत. दैनंदिन जिवन जगत असताना या मुला-मुलींना अनेक गरजेच्या व सोई सुविधेच्या वस्तूंची गरज असते. ही गरज लक्षात घेता आश्रमासाठी 10 सिलिंग फॅन, बिस्किट बॉक्स व इतर खर्चासाठी रोख रक्कम वाटाणा इ. कडधान्ये देण्यात आली. आश्रमाच्या संचालिका सौ. राजश्री गाडे मॅडम व इतर संचालकांनी सर्वाना आश्रमाची माहिती देऊन दैनंदिनी समजावुन सांगितली. याप्रसंगी परिवर्तन फाऊंडेशन तर्फे संस्थाध्यक्ष कु. ओंकार साळुंखे, श्री. महेश झाडे सर, कु. संदीप व्होनमाने, कु. नम्रता भोसले, कु. निकिता भोसले, कु. पूजा भागवत, कु. मेघा भागवत तर सांगोला विद्यामंदिरचे सहशिक्षक श्री. नागेश भोसले सर, श्री. किरण घोंगडे सर विद्यार्थी कु. संकेत डिगोळे, कु. सुप्रिया भुईटे, कु. भाग्यश्री करपे, कु. मृणाली अडसूळ उपस्थित होते. तसेच सांगोला विद्यामंदिर व परिवर्तन फाऊंडेशनच्या अनेक दानशूर सदस्यांनी यासाठी आर्थिक सहाय्य केले. यावेळी सदर प्रकल्पाचे संकल्पक श्री. नागेश भोसले सर यांनी सर्वांना आवाहन केले की आपण समाजाचे देणे लागतो या भावनेने सर्वानी समाज कार्यात पुढाकार घेऊन गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करावा.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक


