रघुनाथ गायकवाड यांनी जवळा जिल्हा परिषद गटातून उमेदवारीसाठी आपली दावेदारी पक्षाकडे केली व्यक्त 

0

जवळा (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील जवळा जिल्हा परिषद गटातून शिवसेना महाविकास आघाडीकडून रघुनाथ गजाराम गायकवाड यांनी उमेदवारीसाठी आपली दावेदारी पक्षाकडे व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी निष्ठावंत शिवसैनिक म्हणून जवळ-जवळ निश्चित होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना गटाचे युवासेना उपजिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत असून, गेल्या काही वर्षांत त्यांनी पक्षाची मजबुत संघटन बांधणी, शाखा विस्तार आणि जनसंपर्क यामध्ये प्रभावी भूमिका बजावली आहे.

रघुनाथ गायकवाड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खंदे व विश्वासू नेतृत्व असून अत्यंत सक्रिय लोकनेता असलेले आणि सर्वसामान्य जनतेतील लोकप्रिय नेते मानले जातात.त्यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेची तालुकाभरात मजबूत पकड निर्माण केली आहे. त्यांनी शेतकरी गोरगरीब व तालुक्यातील युवकासाठी अनेक आंदोलने करुन महत्वाची भूमिका बजावली आहे.जवळा गटामध्ये सुमारे 40 हजार मतदार असुन. या गटात जवळा, आलेगाव मेडशिंगी, वाणीचिंचाळे, वाकी (घेरडी), वाढेगाव, मांजरी,संगेवाडी, मेथवडे,सावे,बामणी, अशी महत्त्वाची गावे येतात.

रघुनाथ गायकवाड यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांची जनतेसमोर मांडणी करत पक्षाचा आवाज बुलंद ठेवला आहे. सामाजिक कार्य, गोरगरिबांसाठी केलेली सेवा आणि तळागाळातील संपर्क यामुळे ते आज शिवसेनेचे विश्वसनीय आणि जनतेच्या मनात घर केलेले नेतृत्व ठरले आहेत.

त्यामुळे या निवडणुकीत युवा सेनेच्या माध्यमातून केलेल्या कामाचे फळ म्हणून युवा जिल्हा उपप्रमुख रघुनाथ गजाराम गायकवाड यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here