सांगोल्यात काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढणार- तालुकाध्यक्ष अजयसिंह इंगवले-पाटील  

0

काँग्रेसच्या शहर तालुका प्रभारी पदी राजकुमार पवार यांची निवड

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वेश झपके यांच्यासह 23 उमेदवारांची यादी काँग्रेस पक्षाकडे तयार

 सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला नगरपरिषदेची निवडणूक काँग्रेस स्वाबळावरती निवडणूक लढणार असल्याची माहिती सांगोला तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजयसिंह इंगवले-पाटील यांनी दिली.

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा.पी.सी झपके सर यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वामध्ये नगरपरिषदेची निवडणूक लढवण्याचा निर्णय सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत झाला.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी देशाचे नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री श्री. सुशीलकुमारजी शिंदे साहेब, खासदार प्रणितीताई शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ साहेब, सोलापूरचे प्रभारी मोहन जोशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी कडून तालुका निहाय आढावा घेऊन सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रा.सातलिंग शटगार मार्गदर्शनाखाली तसेच काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा.पी.सी.झपके सर व जिल्हा कार्याध्यक्ष व सांगोला प्रभारी श्री. राजकुमार पवार, सुनील भोरे सर, महिला ता.अध्यक्ष सुमित्रा लोहार, शहर अध्यक्ष तोहीद मुल्ला यांनी प्रमुख नेते यांच्याशी समन्वय साधून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची प्रचार यंत्रणा सर्वांना बरोबर घेऊन व्यवस्थितपणे राबवून तालुक्यातून जास्तीत जास्त काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आलेली आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here