सांगोला (प्रतिनिधी): नगराध्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उमेदवार विश्वेश झपके हे एक नवा आणि प्रभावी चेहरा म्हणून उदयास आले आहेत. त्यांच्या अभ्यासूपणा, विकासाची दूरदृष्टी आणि शांत स्वभावामुळे सांगोल्यातील विविध समाजघटकांकडून त्यांना मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, ज्यामुळे निवडणुकीचे वातावरण ढवळून निघाले आहे.

नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी करत असलेले विश्वेश झपके हे सांगोल्यात तसे नवीन असले तरी, त्यांच्याकडे समस्यांचा अभ्यासू दृष्टीकोन आणि शहराच्या विकासाची स्पष्ट दूरदृष्टी आहे. त्यांच्या याच गुणांमुळे सुशिक्षित वर्ग आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे.

प्रचारावर मोठा जोर
झपके यांच्या प्रचारात बैठका आणि नियोजनबद्ध संपर्क दौऱ्यांवर विशेष भर दिला जात आहे. प्रचाराची दिशा पारंपरिक नसून थेट मतदारांशी संवाद साधण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे. त्यांच्या प्रचार पथकाने ‘होम टू होम’ (घरोघरी) प्रचार मोहिमेवर मोठा जोर दिला आहे. या माध्यमातून ते प्रत्येक मतदारांपर्यंत वैयक्तिकरित्या पोहोचून, त्यांच्या समस्या ऐकून घेत आहेत आणि आपल्या विकासाच्या संकल्पना मांडत आहेत.
शांत आणि संयमी स्वभाव असल्याने त्यांना तरुण आणि ज्येष्ठांकडून सारखाच पाठिंबा मिळत आहे. अपक्ष असूनही मिळत असलेला हा वाढता प्रतिसाद पाहता, विश्वेश झपके यांनी सांगोला नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे, असे चित्र दिसत आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक




