आलदर हॉस्पिटलच्या वतीने घेरडी येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

0

सांगोला (प्रतिनिधी):सांगोला तालुक्यातील गरजू नागरिकांना आरोग्य सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने आलदर हॉस्पिटलच्या वतीने घेरडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे एका भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराचा मुख्य उद्देश हा शासनाच्या महत्त्वाकांक्षी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPSJAY) आणि केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना यांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचवणे हा आहे.

या शिबिरात विशेषतः पांढरे, केसरी व पिवळे रेशन कार्डधारक कुटुंबांना मोफत वैद्यकीय सल्ला व योजनेबद्दल माहिती दिली जाईल. योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आपले आयुष्यमान भारत कार्ड (गोल्डन कार्ड) सोबत आणणे अनिवार्य आहे.

हे शिबीर मंगळवार, दि.२५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ०२ या वेळेत प्राथमिक आरोग्य केंद्र, घेरडी ता. सांगोला येथे होणार असून आलदर हॉस्पिटलचे डॉ. महावीर आलदर यांनी परिसरातील गरजू रुग्णांना वेळेवर उपस्थित राहून या महत्त्वपूर्ण आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here