प्रभाग क्र. ११ मध्ये ‘नितीन इंगोले’ नावाचं वादळ!; नागरिकांचा अभूतपूर्व पाठिंबा

0

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ११ (क) हा यंदा चर्चेचा विषय ठरला आहे. शिवसेनेचे तडफदार उमेदवार आणि सुप्रसिद्ध उद्योजक नितीन इंगोले यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असून शांत, स्पष्ट आणि पारदर्शक कामकाज शैलीमुळे त्यांचे पारडे स्पष्टपणे जड झाले आहे अशी चर्चा सुरु आहे.

 उद्योजकतेचा अनुभव, जनसंपर्काची ताकद

नितीन इंगोले यांनी उद्योजक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या अनुभवाचा फायदा त्यांना निवडणुकीत मिळत आहे. निव्वळ आश्वासने न देता, प्रत्यक्ष काम करण्याची क्षमता त्यांच्यात आहे, असा विश्वास मतदार व्यक्त करत आहेत.

सक्रिय जनसंपर्क: निवडणुकीच्या पूर्वीपासूनच त्यांचा प्रभागात सक्रिय जनसंपर्क राहिला आहे. मतदारांशी भावनात्मक आणि वैयक्तिक संवाद साधण्यात ते यशस्वी ठरले आहेत.

युवा नेतृत्वाचा चेहरा: उच्चशिक्षित आणि तरुण नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असल्याने युवा वर्गातून त्यांना मोठे समर्थन मिळत आहे.

विकासाची नवी दिशा: ‘सर्व सुविधां’चे आश्वासन

प्रचारादरम्यान नितीन इंगोले यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचे एक विस्तृत व्हिजन मतदारांसमोर ठेवले आहे. पिण्याचे पाणी, रस्ते, गटारे, स्वच्छता आणि दिव्यांची सोय यांसारख्या मूलभूत सुविधांची त्रुटी दूर करण्याचे ठोस आश्वासन त्यांनी दिले आहे.

 “प्रभागातील नागरिकांना केवळ सुविधांचे आश्वासन नाही, तर त्या सुविधा प्रत्यक्षात मिळवून देण्याची माझी बांधिलकी आहे. माझा प्रत्येक निर्णय आणि कामकाज हे नागरिकांप्रति ‘पारदर्शक’ असेल,” अशी भूमिका नितीन इंगोले यांनी जाहीर सभेत स्पष्ट केली.

 शांत आणि पारदर्शक कार्यशैली ठरतेय ‘ट्रम्प कार्ड’

राजकीय गोंधळ किंवा आरोप-प्रत्यारोप यापासून दूर राहून, इंगोले यांनी ‘शांत, स्पष्ट आणि पारदर्शक’ प्रचार नीतीचा अवलंब केला आहे. त्यांच्या या कार्यशैलीला सुज्ञ मतदारांनी पसंती दिली आहे. प्रभागातील अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला असून, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद एका मोठ्या बदलाचे संकेत देत आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here