आलदर हॉस्पिटल मध्ये ६ महिन्याच्या बाळावर करण्यात आले मोफत उपचार

0

आलदर हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून जत तालुक्यातील वाळेखिंडी या गावातील बाळावर मोफत उपचार करण्यात आले. या योजनेच्या माध्यमातून बाळाला रात्री १ वाजता अचानक फिट झटके आल्यामुळे बाळाचे नातेवाईक ताबडतोब बाळाला हॉस्पिटल मधे घेऊन आले . बाळावर त्वरित उपचार चालू केल्यामुळे बाळाचे फिट झटके थांबण्यास सुरवात झाली , त्या नंतर बाळाचे रक्त तपासणी ,MRI , EEG करण्यात आले . बाळा ची प्रकृती ७ दिवसा मधे पूर्ण सुधरल्या नंतर घरी डिसचार्ज देण्यात आला. सर्व उपचार आलदर हॉस्पिटल मध्ये मोफत करण्यात आले आहेत.

डॉ. महावीर आलदर (बालरोगतज्ज्ञ) यांनी या बाळावर यशस्वी उपचार मोफत करून डिस्चार्ज दिल्याने नातेवाईक आनंदित झाले व नातेवाईकांनी रुग्णालयात अतिशय उत्तम सुविधा मिळाली ह्याचा अनुभव व्यक्त केला.नातेवाईकांना जेवण, औषधे व इतर सर्व सुविधा रुग्णायलातून मोफत व उत्तम देण्यात आल्यामुळे नातेवाईकांनी आलदर हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टर्स व इतर स्टाफचे आभार व्यक्त केले.तरी सर्व गरजू रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. आलदर यांनी केले आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here