सांगोला (प्रतिनिधी): नवीन अमरावती–पंढरपूर– मिरज एक्सप्रेस व मिरज– सोलापूर –कलबुर्गी–मिरज या रेल्वे सेवा नियमित सुरू ठेवाव्यात अशी मागणी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक (मुंबई)यांच्याकडे निवेदनाद्वारे शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने केली आहे.

आषाढी एकादशी निमित्त रेल्वे प्रशासनाने 01107& 01108 अनारक्षित मिरज –कलबुर्गी– मिरज,01453 नवीन अमरावती – पंढरपूर–मिरज एक्सप्रेस या रेल्वे सेवा हंगामी यात्रेकरीता सुरु केल्या असून या रेल्वेला प्रवाशांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या भागातून जाणाऱ्या सर्व प्रवाशांची मोठी सोय होत आहे.
सकाळच्या सत्रात कवठेमंकाळ, ढालगाव, जत रोड, सांगोला, पंढरपूर येथून रेल्वेने सोलापूर, अक्कलकोट ,गाणगापूर जाण्याकरता कोणतीही सोय नसल्याने मिरज –कलबुर्गी अनारक्षित रेल्वे सर्व थांबे घेऊन पोहचत असल्याने व परतीच्या प्रवासात देखील ही रेल्वे सोईस्कर आहे.

या गाडीस मुदतवाढ देणे आवश्यक आहे, मुदतवाढ मिळाली तर कोल्हापूर, सांगली, सोलापूर या तिन्ही जिल्ह्यातील प्रवाशांची सोय होणार आहे. तसेच 01453 मिरज– न्यू अमरावती रेल्वे देखील दररोज सुरू राहावी अशी भावीक –भक्तांची मागणी आहे त्यामुळे प्रवाशांना थेट सांगोला,पंढरपूर अहिल्यानगर, मनमाड, चाळीसगाव, जळगाव ,भुसावळ, शेगाव (गजानन महाराज मंदिर), अकोला, मुर्तीजापुर, बडनेरामार्गे अमरावतीला जाण्याची सोय होणार आहे या गाडीमुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ जोडला जाणार आहे.
तरी या दोन्ही रेल्वे गाड्यांना सहा महिने मुदतवाढ मिळावी अशी आग्रही मागणी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक (सोलापूर) प्रशासनाकडे शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेने केलेली आहे.
निवेदन देतेवेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



