सांगोल्यात राष्ट्रीय पत्रकार सुरक्षा कायद्यासाठी साक्षरता अभियानाची सुरुवात 

0

सांगोला (प्रतिनिधी): द जर्नालिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघटना यांच्या सांगोला येथील पश्चिम महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात स्वतंत्र पत्रकार कक्षाची सभा नुकतीच उत्साहात पार पडली. या सभेत राष्ट्रीय पत्रकार सुरक्षा कायदा देशभरात प्रभावीपणे अमलात यावा, यासाठी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राकेश यादव यांच्या निर्देशानुसार राष्ट्रीय साक्षरता अभियानाची सुरुवात पश्चिम महाराष्ट्र प्रदेश कार्यालयातून करण्यात आली.

सभेमध्ये पत्रकारांच्या विविध समस्या, संघटनात्मक बळकटी, पत्रकार संरक्षण, डिजिटल माध्यमांची भूमिका तसेच आगामी उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी संघटनेचे सदस्य तथा दैनिक तुफान क्रांतीचे संपादक मिर्झा गालिब मुजावर यांना छत्रपती शाहू पुरस्कार आणि शब्दवेध पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या बैठकीस स्वतंत्र पत्रकार, लेखक, कवी, साहित्यिक तसेच प्रिंट व डिजिटल मीडियाशी संबंधित संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेच्या शेवटी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारितेची आवड असलेल्या युवक-युवतींसह इच्छुक नागरिकांनी संघटनेच्या कार्यालयाशी संपर्क साधून संघटनेच्या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here