ठळक बातम्या – 16/09/2026

0

✒️ मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच

▪️अंतरवाली सराटीमधील उपोषणाची जागा सोडली, गाडीत बसताच रडले आणि म्हणाले, समाजाच्या लेकरांसाठी लढत राहण्याचा निर्धार

✒️ गणेशोत्सवामुळे मुंबईत परवानगी नाहीच

▪️मनोज जरांगे पाटलांना मुंबईच्या वेशीवरच अडवले जाण्याची शक्यता

▪️पोलीस सूत्रांची माहिती

✒️ मनोज जरांगे पाटील उपोषण नेमकं कोणासाठी करतायेत?

▪️अजय बारस्करांचा सवाल

▪️आरक्षणाच्या नावावर जरांगेंच्या टोळीनं मोठा पैसा कमावल्याचा आरोप

✒️ जरांगेंची भाषा अयोग्यच

▪️कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर नाराजीचा सूर

▪️सूत्रांची माहिती

✒️ इम्रान खानला वाचवण्यासाठी क्रिकेटविश्व एकवटलं

▪️7 ऑस्ट्रेलियन कर्णधारांनी उचललं मोठं पाऊल

✒️ आमदारांनी वेगळी भूमिका घेतली तीच शिवसेनेतील राजकीय फूट समजावी

▪️एकनाथ शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

▪️ठाकरेंचे मुद्दे खोडून काढले

✒️ केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या कॉन्व्हॉयमध्ये घुसून वाहनाला मारला कट

▪️मद्यधुंद चालकावर गुन्हा दाखल

✒️ आमच्यावर टीका करण्याचा अधिकार, पण टीकेमध्ये समाजाची बाजू असली पाहिजे, राजकीय भूमिका असू नये

▪️मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

✒️ गृहमंत्री अमित शाहांच्या ‘हिंदी भाषा दिवस’ कार्यक्रमातील भाषणानंतर राज ठाकरेंच्या मोजक्या पोस्टची चर्चा

▪️म्हणाले, कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते

✒️ दिशा सालियन मृत्यूप्रकरणात आदित्य ठाकरेंचा दुरान्वये संबंध नाही

▪️ FIR दाखल झाल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

✒️ राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

▪️सहकारी साखर कारखान्यांनाही सॉफ्ट लोन मिळणार

▪️मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय

✒️ बळीराजाची चिंता वाढवणारी बातमी; पुढील 15 दिवस पाऊस मारणार दडी

▪️नागपूर वेधशाळेनं शेतकऱ्यांना दिला पावसाची वाट न पाहण्याचा सल्ला

✒️ दिघीमध्ये जहाजबांधणी

▪️भारतातील सर्वात मोठा प्रकल्प रायगडमध्ये

▪️माझगाव डॉकची २७ हजार कोटींची गुंतवणूक

▪️९० हजार जणांना मिळणार रोजगार

✒️ यूपीआय पेमेंटला शुल्क लागू

▪️२००० रु. हून अधिक – ०.४ टक्के शुल्क

▪️२००० पर्यंत – मोफत

✒️ रशियाशी व्यापार केल्याबद्दल भारतावर टॅरिफचा प्रस्ताव

✒️ वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी आज भारताची संघनिवड

✒️ भारतीय बुद्धिबळ संघ पाच तास विमानतळावरच ताटकळत

✒️ अग्रमानांकित झ्वेरेव्ह यूएस ओपनचा राजा

✒️ गुरुवर्य बापूसाहेब झपके गुणवंत शिक्षक पुरस्कार भागवत भाटेकर यांना जाहीर

▪️आज सकाळी १० वा. कै. गुरूवर्य बापूसाहेब झपके स्मृतीसमारोह सांगता समारंभ

✒️ गणेशोत्सवाची सुरुवात वृक्षारोपणाने

▪️गणेशोत्सवाला सामाजिक कार्याची जोड देणे हे नृसिंह मंडळाचे कार्य कौतुकास्पदः लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा (भाऊ) माने

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here