✒️ राज्यभर गणरायाचं आगमन उत्साहात
▪️विघ्नहर्त्याचा पवित्र सण नवी ऊर्जा, उत्साह अन् समृद्धी घेऊन येवो
▪️गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान मोदींकडून देशवासीयांना खास शुभेच्छा
✒️ मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
▪️गणेश उत्सवानंतर आणि आझाद मैदान सोडून इतर ठिकाणी परवानगी देण्याचा विचार, पोलिसांचं पत्र
▪️ जरांगेंच्या भूमिकेकडे लक्ष
✒️ मरेन पण मागं हटणार नाही, गद्दारीचा डाग लावून घेणार नाही, खितपत पडून मरणार नाही, गुडघे टेकून शरण जाणार नाही’
▪️मनोज जरांगे पाटलांचा मुंबईत उपोषणाचा निर्धार
▪️उद्याच आंतरवाली सोडणार
✒️ कदाचित ही आपली शेवटची भेट असेल, आशीर्वाद द्यायला या, मनोज जरांगेंचं काळीज पिळवटून टाकणारं वाक्य
▪️मराठा बांधवांना भावनिक साद
✒️ शक्य तितक्या भाषा शिकाव्यात, पण आपली मातृभाषा सोडू नये
▪️अमित शाहांचे मुंबईतील कार्यक्रमात वक्तव्य
▪️मातृभाषेसोबत दुसरी राष्ट्रीय भाषा शिकायला विरोध करणारे पाप करतायत
▪️ राजभाषा संमेलनात अमित शाहांचा हिंदी विरोधकांवर हल्लाबोल

✒️ जागतिक पातळीवर पंतप्रधान मोदी हिंदी बोलतात तेव्हा छाती अभिमानाने फुगते
▪️मुंबईतील सहाव्या अखिल भारतीय भाषा परिषदेमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
✒️ दिशा सालियनप्रकरणी सीबीआयकडून एफआयआर दाखल, दिशाचे वडील सतीश सालियन यांच्या जबाबाचा एफआयआरमध्ये उल्लेख
▪️जबाबात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुखांचं नाव
✒️ MH CET डेटा लीक अन् सेंटर मॅनेजमेंट प्रकरणाची होणार चौकशी
▪️मुख्यमंत्री फडणवीसांचे FIR आणि फॉरेन्सिक ऑडिटचे आदेश
✒️ पत्नीसह आई वडिलांनीही नाकारलं !
▪️भाजपच्या उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत, दारुन पराभव झाल्यानं देशभर चर्चा
✒️ राज्य सरकार हिवाळी अधिवेशनात यूसीसी विधेयक मांडण्याच्या तयारीत – देवेंद्र फडणवीस

✒️ लंडनमध्ये थेम्स नदीच्या काठावर ऐतिहासिक पहिली ‘गंगा आरती’
✒️ ‘एस-४००’ ने ३१४ किमीवरील पाकिस्तानी विमान पाडले
▪️संरक्षण खात्याच्या ताज्या अहवालात उघड
✒️ ST चा ताफा अधिक सक्षम होणार, तब्बल पाच हजार ‘लालपरी’बस येणार
▪️गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड नाही : मंत्री प्रताप सरनाईक
✒️ महिला ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया कप स्पर्धेच्या फायनलमध्ये टीम इंडियाची श्रीलंकेवर मात
▪️72 धावांनी विजय मिळवत आठव्यांदा कोरलं नाव, तर आशिया क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष मोहसीन नकवींच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास नकार
✒️ चंद्राच्या सोबतीला शुक्रतारा!
▪️आकाशात ग्रहांची युती! मनमोहक नजारा
✒️ माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब,
▪️मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला

✒️ गणरायाच्या आगमनाने सांगोला शहर व तालुका झाले भक्तिमय
▪️रात्री उशिरापर्यंत गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना सुरू
▪️ढोल-ताशांचा निनाद अन् ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष
✒️ आरोग्य तपासणीपासून शेळ्या व शिलाई मशीन वितरणापर्यंत नृसिंह मंडळाचा २९ वा गणेशोत्सव सेवाभावी उपक्रमांनी होणार साजरा
▪️आरोग्य तपासणी, वृक्षारोपण, दिव्यांग बांधवांसाठी उपक्रम, गरजू महिलांना शिलाई मशीन व लाभार्थींना शेळ्यांचे वितरणासह विविध स्पर्धा
✒️ वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना
✒️ उत्कर्ष विद्यालयात ढोल-ताशांचा गजर, लेझीम-झांज आणि आकर्षक सजावटीत गणरायाचे मंगलमय आगमन
✒️ महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ नियोजन खात्याकडे वर्ग
▪️डॉ. बसवराज बगले यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर शासन निर्णय
✒️ वाढेगाव येथील समाधी वादावर निष्पक्ष चौकशी कराः नाथपंथी डवरी गोसावी समाज बांधवांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
✒️ सांगोला तालुक्यात ३०० हून अधिक सार्वजनिक मंडळांनी केली श्री गणेश मूर्तीची स्थापना

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



