ठळक बातम्या – 21/09/2026

0

✒️ राहुल गांधींनी पार्टीला बेरोजगार केलंय,त्यांनी स्टँड अप कॉमेडीचं काम हाती घ्यावं म्हणजे रोजगार मिळेल

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पीएम मोदींच्या मिमिक्रीवरुन प्रत्युत्तर

✒️ मतदारयादीत अडवाणी, सिसोदिया यांच्या नावात विसंगती

▪️निवडणूक अधिकाऱ्याने पाठवली नोटीस

▪️’वैध मते हटवून अवैध मते जोडण्याचा प्रकार’ – कपिल सिब्बल

✒️ नांदेडमधील काजू-बदाम प्रकरणानंतर अधिकऱ्यांचा असंवेदनशील चेहरा पुन्हा समोर

▪️कृषीमंत्र्यांच्या अकोल्यातील दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईल पाहण्यात दंग

▪️दत्तात्रय भरणेंचं कारवाईचं आश्वासन

✒️ दुष्काळ जाहीर करा, विकासकामे थांबवा, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना जगवण्यासाठी खर्च करा

▪️आमदार रोहित पवारांची सरकारकडे मागणी

▪️हिरव्या चाऱ्याचे भाव भिडले गगनाला

▪️सोलापूर जिल्ह्यात बळीराजावर पशूधन विकण्याची वेळ

✒️ दिशा सालियन प्रकरणी कायद्याला त्याची प्रक्रिया पूर्ण करू द्यावी, या विषयावर रोज भाष्य करणे माझ्यासाठी योग्य नव्हे

▪️मंत्री नितेश राणे यांची पोस्ट

✒️ मुंबईतील काळाचौकीचा महागणपतीच्या मंडपासमोर रात्री दोन वाजता आक्रित घडलं

▪️विजेचा धक्का लागून 8 वर्षांच्या मुलीचा आणि 33 वर्षीय महिलेचा मृत्यू

✒️ ‘राजसाहेब मुख्यमंत्री होवोत’, अमित ठाकरेंची दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी प्रार्थना

▪️पुण्यात बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

✒️ राधाकृष्ण विखे पाटील यांची पुतणी नीला विखे पाटील स्वीडनची खासदार बनली

▪️स्टॉकहोम शहर मतदारसंघात विजय मिळवला

✒️ मुंबईत ठाकरेंसह काँग्रेसला मोठा धक्का!

▪️शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

✒️ टीईटी पेपरफुटी प्रकरणात आणखी दोन आरोपींना अटक

▪️एक आरोपी बिहारचा तर दुसरा महाराष्ट्रातील

✒️ सोलापुरात दुष्काळामुळे गुरांचा चाराप्रश्न गंभीर

▪️एक टन चाऱ्याचा दर ६ हजार रुपये

✒️ यूक्रेनचा हजारो ड्रोनद्वारे रशियावर सर्वात मोठा हल्ला

▪️1900 ड्रोन रोखल्याचा रशियाचा दावा, 2 जणांचा मृत्यू

✒️ किम जोंग उनच्या उत्तर कोरियाचा काही तासांच्या अंतराने दोन बॅलिस्टिक मिसाईलचा मारा

▪️जपानच्या पंतप्रधानांकडून तातडीने मोठ्या हालचाली

▪️दक्षिण कोरियातही खळबळ

✒️ आधी शेफालीचं वादळी शतक, मग गोलंदाजांची दमदार कामगिरी

▪️बांगलादेशला लोळवत भारत आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत

✒️ श्रीलंकेकडून पाकिस्तानचा गेम ओव्हर

✒️ लक्ष्मीपती बालाजीची भारत अ संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती

▪️ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपासून सांभाळणार धुरा

✒️ इलावेनिलचा दुहेरी धमाका !

▪️नेमबाजीत भारताला दोन रौप्यपदक

✒️ सर्वदूर पावसासाठी मुस्लिम समाज बांधवांचे सामूहिक नमाज पठण संपन्न

▪️मुस्लिम समाज बांधवांनी शेतकऱ्यांच्या समृद्धीसह सर्व समाजाच्या कल्याणासाठी केली दुआ

✒️ नृसिंह गणेश मंडळाच्या रंगभरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

▪️३० विद्यार्थ्यांची प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी निवड;

▪️लकी ड्रॉमधून १० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

✒️ गणरायाच्या उत्सवात लोहार गल्लीने धरली हिरवाईची वाट !

▪️जय नृसिंह गणेशोत्सव मंडळाचा वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

▪️नगरपरिषदेला १५ झाडांची भेट

✒️ सांगोला तालुकास्तरीय कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धेत जवळे विद्यालयाचे दैदिप्यमान यश

✒️ सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व शिक्षक लोकशाही आघाडीची बैठक संपन्न

✒️ डीजेच्या दणदणाटाला फाटा; भजनाच्या तालावर चोपडीत गणरायाला भावपूर्ण निरोप

✒️ अमर गणेश मंडळाच्या चित्रकला, रक्तदान व आरोग्य शिबिर अशा विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here