सांगलीतील शिक्षक मेळाव्यात पाठिंब्याचे पत्र प्रदान; कपिल पाटील आणि अशोक बेलसरे यांचे मानले विशेष आभार
सांगली :पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार प्रा. सचिन नवनाथ सानप यांना शिक्षक भारती संघटनेने अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. सांगली येथे आयोजित शिक्षक मेळाव्यात संघटनेच्या वतीने पाठिंब्याचे अधिकृत पत्र प्रदान करण्यात आले. या विश्वासाबद्दल प्रा. सचिन सानप यांनी शिक्षक भारती संघटनेचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

या पाठिंब्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रा. सानप यांनी शिक्षक भारतीचे संस्थापक मा. श्री. कपिल पाटील आणि संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. अशोक बेलसरे यांचे विशेष आभार मानले. शिक्षकांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सुरू असलेल्या लढ्यात संघटनेने दिलेला पाठिंबा हा केवळ आपल्या उमेदवारीला मिळालेला आधार नसून, शिक्षकांच्या प्रश्नांप्रती असलेल्या सामूहिक बांधिलकीची पावती असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिक्षकांचे प्रश्न, त्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. शिक्षक भारतीने दाखवलेला विश्वास आणि दिलेले सहकार्य हे आपल्या पुढील वाटचालीसाठी महत्त्वाचे बळ असल्याची भावना प्रा. सानप यांनी व्यक्त केली.
“आपला विश्वास, आशीर्वाद आणि सहकार्य हेच माझे खरे बळ आहे,” अशा भावना व्यक्त करत प्रा. सचिन सानप यांनी शिक्षक भारतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिक्षक बांधवांचे आभार मानले.
शिक्षक भारतीच्या अधिकृत पाठिंब्यामुळे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील प्रा. सचिन सानप यांच्या उमेदवारीला संघटनात्मक बळ मिळाल्याचे चित्र आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



