वर्षावासानिमित्त उषा धनवडे यांचा समाजबांधवांनी केला सन्मान

0

वाटंबरे (प्रतिनिधी) – येथील उषा उध्दव धनवडे यांनी बौध्द धर्माच्या परंपरेनुसार वर्षावास म्हणजेच आषाढ ते आश्विन महिन्यातील पौर्णिमेपर्यंत तीन महिने कडक उपवास केला आहे. हा केवळ उपवास नसून या काळात संयम, साधना आणि शीलनियम याची पाळणूक केली जाते.

एवढेच नव्हे तर जवळच्या बौध्द विहारात जाऊन पंचशील पालन करणे, रोज ध्यानधारणा करणे, आहारात संयम राखणे, अकुशल करण्यापासून दूर राहणे, भिक्षूंना दान करणे यासारख्या अनेक गोष्टींचे तंतोतंत पालन उषा धनवडे यांनी केले आहे.त्याचबरोबर समाजातील इच्छुक मुलींना बौध्द धर्मातील सर्व विधींचे प्रशिक्षण दिले आहे.यावेळी त्यांना त्यांचे पती उध्दव धनवडे यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे.

या दांपत्याने समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवल्यामुळे समाजातील सर्व महिला व पुरुषांच्या वतीने उषा व उध्दव धनवडे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here