कडलासमधील नवजात बालकाला आलदर हॉस्पिटलमध्ये मोफत
उपचार
सांगोला (प्रतिनिधी) : सध्या सांगोला तालुक्यासह संपूर्ण परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक शेतकरी, शेतमजूर व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना आरोग्यसेवेचा खर्च पेलणे कठीण होत आहे. अशा परिस्थितीत कोणतेही बालक आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहू नये, या उद्देशाने शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (आयुष्मान भारत) या योजनांच्या माध्यमातून मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध आहे.

याचाच लाभ कडलास येथील एका नवजात शिशूला मिळाला आहे. जन्मानंतर या बालकाला कावीळ झाल्याने उपचारांची आवश्यकता निर्माण झाली होती. सांगोला येथील आलदर हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून या नवजात बालकावर मोफत उपचार करण्यात आले. त्यामुळे संबंधित कुटुंबाला मोठा आर्थिक दिलासा मिळाला.

आलदर हॉस्पिटल, सांगोला येथे लहान मुलांच्या विविध आजारांवर तज्ज्ञ वैद्यकीय उपचारांची सुविधा उपलब्ध असून, नवजात बालकांपासून ते अठरा वर्षापर्यंतच्या मुलांपर्यंत आवश्यक उपचार केले जातात. विशेषतः आर्थिक परिस्थितीमुळे मुलांच्या उपचारांमध्ये अडथळे येऊ नयेत, यासाठी शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ रुग्णांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर व गरजू कुटुंबांनी आपल्या मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना मोफत उपचार मिळू शकतात. त्यामुळे दुष्काळग्रस्त व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांनी या योजनांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन आलदर हॉस्पिटलचे डॉ. महावीर आलदर यांनी केले आहे.

“आर्थिक अडचणीमुळे कोणतेही बालक उपचाराविना राहू नये, प्रत्येक बालकाला वेळेवर आणि योग्य उपचार मिळावेत, हाच आमचा प्रयत्न आहे,” असा संदेशही डॉ. आलदर यांनी दिला आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



