सांगोल्यात ‘काटे की टक्कर’; अपक्ष उमेदवाराचा कौल ठरणार विजयासाठी निर्णायक!

0

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले होते. राज्यात शिवसेना आणि भाजपची युती असली, तरी सांगोल्यात मात्र हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या तिरंगी लढतीत अपक्ष उमेदवाराला मिळणारी मतेच विजयाचे समीकरण ठरवणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

या निवडणुकीत राजकीय समीकरणे वेगाने बदलली. शेतकरी कामगार पक्षाचे दिग्गज नेते मारुती आबा बनकर यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश करून कमळ चिन्हावर निवडणूक लढवली, ज्यामुळे भाजपची ताकद वाढली आहे. दुसरीकडे, शिवसेनेने माजी नगरसेवक आनंदा माने यांच्या रूपाने अनुभवी चेहरा रिंगणात उतरवून भाजपला कडवे आव्हान दिले आहे. या दोन्ही पक्षांनी आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी सर्वस्व पणाला लावले आहे.

अपक्ष उमेदवाराची ‘एन्ट्री’ आणि वाढलेली धाकधूक

निवडणुकीत सर्वाधिक चर्चा होती ती अपक्ष उमेदवार विश्वेश झपके यांची. झपके यांनी प्रचारात घेतलेली झेप पाहता, ते प्रस्थापित पक्षांच्या मतांच्या गणितात मोठी फाटाफूट करण्याची शक्यता आहे.

विजयाचे गणित काय सांगते?

  जर अपक्ष उमेदवाराने मोठी मते घेतली, तर त्याचा थेट फटका शिवसेना किंवा शहर विकास आघाडी यांपैकी कोणाला बसणार, यावरच निकालाचा कौल अवलंबून असेल.

शेकापच्या बालेकिल्ल्यात बनकर यांची भाजपमधील एन्ट्री किती यशस्वी ठरते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

रविवारी निकालाचा थरार

सत्तासंघर्षाच्या या रणधुमाळीत सांगोल्याचा नवा ‘नगराध्यक्ष’ कोण होणार? याचा फैसला आता मतदारांच्या हातात आहे. दिग्गजांच्या प्रतिष्ठेच्या या लढाईत अपक्ष उमेदवार ‘किंगमेकर’ ठरणार की प्रस्थापित पक्षांपैकी कोणी बाजी मारणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.२१ डिसेंबर रोजी सकाळी मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल.

​भाजप आपली नवी खेळी यशस्वी करणार? शिवसेना आपला गड राखणार?  की अपक्ष उमेदवार सर्वांना धक्का देणार?

​या सर्व प्रश्नांची उत्तरे रविवारी मिळतील. प्रशासनाकडूनही मतमोजणीसाठी कडक बंदोबस्त आणि जय्यत तयारी करण्यात आली आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here