अशोक कामटे संघटनेच्या वतीने महारक्तदान शिबिराने होणार शहीद पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना अभिवादन

0

 

सांगोला ( प्रतिनिधी): मुंबईतील अतिरेकी हल्ल्यात कर्तव्य बजावताना वीरमरण पत्करलेल्या शहीद पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ ते सायंकाळी सहा या कालावधीत स्टेशन रोड, विटा बँकेसमोर येथे सर्वांसाठी रक्तदान शिबिरांचे आयोजन केल्याची माहिती अशोक कामटे संघटनेच्यावतीने दिली.

कामटे संघटनेच्या वतीने सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे रक्तदान शिबिर होत असून राज्यातील सर्वसामान्य रुग्ण, नागरीक व कर्तव्यावर कार्यरत पोलिस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना मोफत रक्त देणाऱ्या रेवनील ब्लंड बँकेच्या वतीने या शिबिराचे रक्त संकलन केले जाणार असून हा उपक्रम अशोक कामटे संघटना गेली 17 वर्षे राबवत आहे.

यंदाचे शिबिराचे 18 वे वर्ष आहे सद्यस्थितीमध्ये रक्ताचा असणारा तुटवडा लक्षात घेऊन या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सामाजिक जाणीवेतून अधिकाधिक युवकांनी रक्तदानासाठी प्रवृत्त व्हावे, हा या शिबिराचा उद्देश आहे. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते होणार असून यावेळी केंद्र सरकार व सांगोला येथील विविध प्रशासकीय अधिकारीअधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या रक्तदान शिबिराची रुग्ण कल्याणकारी गरज लक्षात घेऊन या शिबिरात नागरिकांनी विक्रमी रक्तदान करून सामाजिक जाणीवेची ज्योत प्रज्वलित ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here