आलदर हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ९ महिन्यांच्या बालकावर मोफत उपचार

0

पालकांकडून डॉ. महावीर आलदर व हॉस्पिटल स्टाफचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार; शासकीय आरोग्य योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

सांगोला (प्रतिनिधी): शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळत असून, या योजनेचा लाभ अनेक कुटुंबांसाठी दिलासादायक ठरत आहे. याचाच प्रत्यय सांगोला येथील आलदर हॉस्पिटलमध्ये आला.

गौडवाडी येथील अवघ्या ९ महिन्यांच्या बालकाला गेल्या दोन आठवड्यांपासून सतत ताप येत होता. त्यामुळे पालकांनी बालकाला उपचारासाठी सांगोला येथील आलदर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हॉस्पिटलमध्ये बालकावर महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत उपचार करण्यात आले.

बालकाला उपचार मिळाल्याने समाधान व्यक्त करत पालकांनी डॉ. महावीर आलदर व हॉस्पिटलमधील सर्व स्टाफचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि मनःपूर्वक आभार मानले.

यावेळी बोलताना डॉ. महावीर आलदर यांनी सांगितले की, शासनाच्या विविध आरोग्य योजनांच्या माध्यमातून गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे कोणत्याही रुग्णाने आर्थिक अडचणीमुळे उपचारापासून वंचित राहू नये. पात्र रुग्णांनी शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती घेऊन त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.आलदर हॉस्पिटलच्या या आरोग्यसेवेमुळे गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळत आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here