शहिदांच्या स्मरणार्थ व संविधान दिनी रक्तदान करून आदरांजली वाहण्याचे आवाहन
सांगोला( प्रतिनिधी ): भारतीय संविधानाच्या ७७ व्या संविधान दिनाचे औचित्य साधून तसेच देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहिदांच्या स्मरणार्थ शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेच्यावतीने शहीद दिनानिमित्त गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

देशाच्या रक्षणासाठी आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी आपल्या प्राणांची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या शूरवीर शहिदांना अभिवादन करण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने हा उपक्रम 17 वर्षापासून अखंडपणे राबविण्यात येत आहे.

रक्तदान हे श्रेष्ठ दान असून, आपल्या रक्तदानामुळे एखाद्या गरजू रुग्णाला जीवनदान मिळू शकते. अपघातग्रस्त, गंभीर आजाराने ग्रस्त तसेच गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या उदात्त हेतूने या रक्तदान शिबिराचे आयोजन 17 वर्षापासून करण्यात येत आहे. यंदा या शिबिराचे 18 वे वर्ष असून रक्तदान शिबिर दिनांक : गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२६- वेळ : सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत – स्थळ : स्टेशन रोड, विटा बँकेजवळ, सांगोला, जि. सोलापूर या ठिकाणी होणार आहे.

संविधानाने दिलेली समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्याय ही मूल्ये जपत प्रत्येक नागरिकाने सामाजिक कार्यात सहभागी होणे गरजेचे आहे. शहिदांच्या स्मरणार्थ रक्तदान करून त्यांना खरी आदरांजली वाहण्याची ही एक संधी आहे.

तरी सांगोला शहर व तालुक्यातील सर्व युवक, युवती, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे, शहिदांच्या स्मृतींना रक्तदानातून अभिवादन करूया… रक्तदान करूया, जीवनदान देऊया असे आवाहन शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



