सांगोला शहरात उद्यापासून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने ‘दुर्गामाता दौड’ 

0

धर्मरक्षणासाठी आणि हिंदू संस्कृतीच्या प्रसारासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला शहरात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सांगोला विभागाच्या वतीने घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत आयोजित करण्यात येणारी ‘दुर्गामाता दौड’ उद्या रविवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२६ पासून उत्साहात सुरू होत आहे. हिंदू समाजाची एकता, संघटन, संस्कार व राष्ट्रभक्तीची भावना वृद्धिंगगत करण्याच्या उद्देशाने या दौडचे आयोजन करण्यात आले आहे. ही दौड रविवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२६ ते मंगळवार दिनांक २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ६:०० वाजता सांगोला शहरातील विविध मार्गांवर्‍ये पार पडणार आहे.

या दौडचे दैनंदिन नियोजन खालीलप्रमाणे आहे:

रविवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजता शिवतीर्थ – हनुमान मंदिर – परिट गल्ली

सोमवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजता शिवतीर्थ – गोधळ गल्ली – अंबिकादेवी मंदिर – वज्राबाद पेठ – शिवतीर्थ.

मंगळवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजता शिवतीर्थ – कोष्टी गल्ली – भोपळे रोड – स्टेशन रोड – शिवतीर्थ.

बुधवार दिनांक १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजता महादेव मंदिर – ध्यान मंदिर – अयोध्या नगरी – महादेव मंदिर.

गुरुवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजता वासुद चौक – शिवाजी नगर – दत्त नगर – गणेश नगर – वासुद चौक.

शुक्रवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजता वासुद चौक – कर्मवीर नगर – वासुद चौक.

शनिवार दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजता अंबिकादेवी मंदिर -विद्यानगर यशनगर – साठे नगर – सनगर गल्ली – अंबिकादेवी मंदिर.

रविवार दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजता अंबिकादेवी मंदिर – पुजारीवाडी – एकतपुर रोड – अंबिकादेवी मंदिर.

सोमवार दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजता शिवतीर्थ – देशपांडे गल्ली – महादेव गल्ली – शिवतीर्थ.

मंगळवार दिनांक २० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजता महादौड पार पडणार असून ती शिवतीर्थ – गोधळ गल्ली – अंबिकादेवी मंदिर – कुंभार गल्ली – मिक्सणूक मार्ग – शिवतीर्थ अशा मार्गाने जाईल.

या सर्व दौड दरम्यान सहभागी होणाऱ्या प्रत्येक नागरिकाने आपल्या डोक्यावर भगवा फेटा किंवा पांढरी टोपी घालूनच सहभागी व्हावे, अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे. सांगोला शहरातील तमाम धर्मप्रेमी व नागरिकांनी या दुर्गामाता दौडमध्ये उत्स्फूर्तपणे आणि मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सांगोला विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here