सिंहगड पब्लिक स्कूलचा अभयसिंह दिपक ऐवळेचा कराटे स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

0

 सिंहगड पब्लिक स्कूल, कमलापूरचा विद्यार्थी चमकला; प्रशिक्षक व शिक्षकांकडून मार्गदर्शन

सांगोला (प्रतिनिधी): क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय, सोलापूर, तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगोला आणि गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांगोला तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कराटे प्रकारात सिंहगड पब्लिक स्कूल, कमलापूर येथील विद्यार्थी अभयसिंह दिपक ऐवळे याने प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशामुळे त्याची सोलापूर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

सांगोला शहरातील क्रीडा संकुल येथे या कराटे स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत खेळाडूंमध्ये राऊंड पद्धतीने सामने घेण्यात आले. अभयसिंहने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली आणि प्रथम क्रमांक मिळवून आपल्या गुणवत्तेची छाप पाडली.

या स्पर्धेसाठी राष्ट्रीय खेळाडू व राष्ट्रीय पंच निजेंद्र चौधरी, गौतम वाघमारे, मयंक स्वामी, सुनील वाघमारे आणि श्रावणी वाघमारे यांनी पंच म्हणून काम पाहिले. तालुका क्रीडा अधिकारी उत्कर्ष शेळके यांच्या उपस्थितीत स्पर्धा पार पडल्या.

अभयसिंह याला सिंहगड पब्लिक स्कूलचे क्रीडाशिक्षक गणेश पवार सर यांचे मार्गदर्शन व विशेष सहकार्य लाभले. तसेच तो सांगोला येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या पाठीमागील मैदानावर सुरू असलेल्या वाघमारे कराटे क्लासेस येथे कराटेचे प्रशिक्षण घेत आहे. प्रशिक्षक गौतम वाघमारे आणि सुनील वाघमारे यांचे त्याला उत्कृष्ट मार्गदर्शन लाभत आहे.

अभयसिंह ऐवळेने मिळवलेल्या या यशामुळे सिंहगड पब्लिक स्कूल, कमलापूर तसेच सांगोला तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल शाळेतील शिक्षक, प्रशिक्षक, क्रीडाप्रेमी आणि सांगोला तालुक्यातील नागरिकांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.जिल्हास्तरीय स्पर्धेतही अभयसिंहने उत्कृष्ट कामगिरी करून यशाची परंपरा कायम राखावी, अशा शुभेच्छा त्याला दिल्या जात आहेत.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here