‘आलदर हॉस्पिटल’तर्फे बुध्देहाळ येथे मोफत बाल आरोग्य शिबिर संपन्न; ८० बालकांची तपासणी

0

सांगोला (प्रतिनिधी):ग्रामीण भागातील बालकांचे आरोग्य सुदृढ राहावे आणि गरजू रुग्णांना वेळेत योग्य उपचार मिळावेत, या सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने बुध्देहाळ (ता. सांगोला) येथे ‘आलदर लहान मुलांच्या हॉस्पिटल’च्या वतीने भव्य मोफत बाल आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवार, दिनांक ३० जून २०२६ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी १:०० या वेळेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बुध्देहाळ येथे हे शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरामध्ये परिसरातील सुमारे ८० मुलांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक औषधोपचार करण्यात आले.

या शिबिरादरम्यान प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. महावीर आलदर यांनी उपस्थित पालकांना बालकांच्या आरोग्याविषयी आणि पोषणाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच शासनाच्या अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ व ‘प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना’ या आरोग्य योजनांची सविस्तर माहिती देऊन, गरजू कुटुंबांनी या योजनांचा लाभ कसा घ्यावा, याबाबत जनजागृती केली.

“ग्रामीण भागातील प्रत्येक बालकापर्यंत चांगल्या आरोग्य सुविधा पोहोचाव्यात, हाच या शिबिराचा मुख्य हेतू आहे.”

— डॉ. महावीर आलदर

या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक हणमंत घाडगे, गोविंद लवटे, संतोष काळे, विकास वलेकर, सतिश गाडे, डॉ. आदर्श गवळी, सुनील बुरुंगे, नसीम मुलाणी यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने माता-पालक उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सर्व उपस्थितांनी विशेष परिश्रम घेतले. ग्रामीण भागात राबवण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल बुध्देहाळ परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here