सांगोला–दापोली बस सेवेचा शानदार शुभारंभ  बसमुळे सांगोला व कोकणचे अतूट नाते राहणार :–मा.आ दीपकआबा साळुंखे– पाटील

0

सांगोला (प्रतिनिधी): दापोली बस सेवेमुळे सांगोलकराचे कोकणाबरोबर अतूट नाते राहणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार दीपकआबा साळुंखे– पाटील यांनी व्यक्त केले. ते सांगोला बस स्थानकात सांगोला–दापोली बस सेवेचा शहीद अशोक कामटे संघटना , सोलापूर जिल्हा प्रवासी सेवा संघ यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रम बस शुभारंभ करतेवेळी बोलत होते त्यांनी कोकणाचे व सांगोला वासियांचे महत्त्वाचे पर्व या बस सेवेमुळे सुरू झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

सुरुवातीस या बसचे विधिवत पूजन , पुष्पहार अर्पण दीपकआबा साळुंखे– पाटील यांनी मिठाईवाटप करून शहीद अशोक कामटे संघटनेच्या वतीने करण्यात आले. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बस चालक गणेश लवटे, वाहक समाधान बंडगर व प्रथम प्रवासी सौ सपाटे मॅडम यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी एसटी महामंडळाचे सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक पृथ्वीराज पारसे, वाहतूक नियंत्रक जलील शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.

भाजपा किसान सेलचे अध्यक्ष शिवाजीराव (आण्णा)गायकवाड, रेल्वे प्रवासी संघटनेचे ॲड बबनराव पाटील, कुमार नरखेडे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.

शहीद अशोक कामटे संघटनेचे अध्यक्ष निलकंठ शिंदे सर यांनी सदर बस सेवेमुळे सांगोला तालुक्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे सांगितले तसेच यापुढील काळात देखील संघटनेच्या माध्यमातून विविध मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार, इर्शाद बागवान,हरी बाबर, अमोल बोत्रे, गणेश दौंडे, अनिल तारळकर, प्रा प्रसाद खडतरे , राजू बंडगर यांनी सदर बसमधील प्रवाशांचे गुलाब पुष्प देऊन संघटनेच्यावतीने स्वागत केले .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मकरंद पाटील व प्रास्ताविक निलकंठ शिंदे सर , प्रवासी संघटनेचे अध्यक्षआभार कुमार नरखेडे यांनी केले यावेळी सांगोला आगारातील चालक, वाहक, प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक कामटे संघटनेच्या सदस्य व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

कोकण हे आंब्याचे माहेरघर व अतिशय चांगले पर्यटन स्थळ आहे ऐन उन्हाळ्यात ही बस सेवा सुरू झाल्याने कोकणातील आंब्याची आवक या माध्यमातून या भागात येण्यास मदत होणार आहे

दापोली भागातील नागरिकांना जाण्या व येण्याकरिता या बस सेवेच्या माध्यमातून मोठी सोय होणार आहे तसेच सांगोलकरांचे कोकणा बरोबरचे संबंध , जिव्हाळ्याचे नाते जोडले जाणार आहे. तसेच ही बस सेवा कायमस्वरूपी सुरू राहण्याकरता प्रवाशांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा, प्रवासी संघटना, अशोक कामटे संघटनेने केलेल्या पाठपुराव्याबद्दल संघटनेचे अभिनंदन या पुढील काळात देखील आपण जनहिताचे अविरत कार्य करत राहावे .

मा. आ दीपकआबा साळुंखे– पाटील

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here