कोळा (प्रतिनिधी): कोळा ता. सांगोला येथील कोळा विद्यामंदिर इंग्लिश मेडीयम स्कूल मधील विद्यार्थी कु.श्लोक विनोद देशमुख यांने मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा मधील नुकत्याच लागलेल्या

राज्य गुणवत्ता यादीमध्ये 150 पैकी 148 गुण मिळवून राज्यात दुसरा क्रमांक मिळवल्याबद्दल सांगोला तालुक्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी श्लोकच्या यशाचे कौतुक करून कोळा विद्यामंदिर इंग्लिश मेडीयम स्कूल, मधील गुणवंत मुलांना आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या व ग्रामीण भागातील मुले राज्य गुणवत्ता यादीत उज्वल करीत असल्याचे नमूद केले. या कार्यक्रमाला सहकारी व पदाधिकारी उपस्थित होते. श्लोक च्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



