✒️ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्ष आक्रमक
▪️6 ऑक्टोबरला खासदारांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
▪️देशव्यापी मोर्चांचं आयोजन
▪️इंडिया आघाडीनं निर्णायक रणशिंग फुंकलं
✒️ ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येनं राजकारण पेटलं
▪️ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीनं हत्येचा कट रचला
▪️मुलगा राम पूर्णेकरचा आरोप
✒️ राज्यात कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या झाल्यात हे सिद्ध झालं
▪️सामान्य माणसाचं सुरक्षित जगणं कठीण होतंय
▪️आदित्य ठाकरे संतापले
✒️ ज्ञानेश कुमार चोर आणि दरोडेखोर, मतचोरी केली, ईव्हीएम मशीन जाळल्या, हॅक केल्या
▪️ममता बॅनर्जींचा हल्लाबोल
✒️ बारामतीमधील सोमेश्वर साखर कारखान्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अन् शिंदेंच्या शिवसेनेची युती
▪️पुरुषोत्तम जगतापांच्या बंडामुळे भाजपही मैदानात
✒️ शेतकरी पीक कर्जमाफीचा तिसरा हप्ता जमा
▪️3 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग
▪️कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

✒️ केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रब्बी हंगामासाठी गहू, बार्ली, हरभरा, मोहरी, करडई आणि मसूर या सहा पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ
▪️केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती
✒️ बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेचा कारागृहातील मुक्काम वाढला
▪️एनआयएच्या याचिकेनंतर मुंबई हायकोर्टाकडून जामिनाला स्थगिती
✒️ पुणे महानगरपालिकेत नोकरीचं आमिष; पावणेतीन कोटींचा गंडा, बनावट शिक्के, सह्या, बोगस जॉईनिंग लेटर अन् पगारही दिला
▪️जेजुरी देवस्थानचा विश्वस्त राजेंद्र खेडेकर याला अटक
✒️ दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य, 1 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू
▪️चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय
✒️ ‘फॉर्म ६ ‘मधील अतिरिक्त घोषणापत्र हटवले
▪️’एसआयआर’ झालेल्या राज्यांमध्ये निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
✒️ प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र विभाग
▪️वर्ग-१ च्या मराठी भाषा अधिकाऱ्याची नियुक्ती
▪️उदय सामंत यांची घोषणा

✒️ पुण्यातील शिक्षक मतदानापासून वंचित ?
▪️प्रा. सचिन सानप यांचा निवडणूक यंत्रणेवर आरोप
✒️ आरक्षण बंद करूनही जातीयवाद संपणार नाही
▪️’आरक्षण हटाव’ आंदोलनावरून सुजात आंबेडकरचा तरुणाईशी संवाद
✒️ सुवर्ण चौकारासह सप्टेंबरची सांगता !
▪️तिरंदाजीत सोने पे सुहागा, तिहेरी पदकांवर निशाणा
▪️नीरू-किनानची सुवर्ण किमया
✒️ 4 शतके, एक द्विशतक अन् 811 धावा !
▪️गुवाहाटीत धावांचा महापूर, भारत आणि वेस्ट इंडिजने ODI क्रिकेटचा इतिहास-भूगोल बदलून टाकला
▪️वेस्ट इंडिज भुईसपाट, भारताचा ऐतिहासिक विजय

✒️ आशियाई क्रीडा स्पर्धेत साताऱ्याच्या साहिलचा ‘गोल्डन’ निशाणा!
▪️भारताच्या तिरंदाजांनी पटकावलं सुवर्ण पदक
▪️भारताची आतापर्यंत 58 पदकांना गवसणी
✒️ भारतीय महिला हॉकी संघाची थाटात अंतिम फेरीत धडक
✒️ जागतिक पर्यटन दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ सांगोलाची एकदिवसीय सहल उत्साहात संपन्न
▪️बहिर्जी नाईक समाधीस्थळ व शुक्राचार्य देवस्थान दर्शन
▪️ऐतिहासिक, धार्मिक आणि मनोरंजनात्मक सहलीत हास्यविनोदाची रंगत
✒️ तिप्पेहळ्ळीच्या परिवर्तन मंचचे समाजपयोगी आदर्श कार्य : आ बाबासाहेब देशमुख
✒️ जिल्हा परिषद शाळांना भौतिक सुविधासह दर्जेदार शिक्षणावर भर देणार : सभापती चेतनसिंह केदार सावंत
✒️ डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला येथे ५ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘मशरूम शेती व व्यवस्थापनः प्रशिक्षणाचे’ आयोजन
✒️ सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीला १ कोटी ८३ लाख ४३ हजारांचा निव्वळ नफा – सभापती समाधान पाटील
▪️आ.डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्च्या इतिहासात प्रथमच रेकॉर्डब्रेक कामगिरी
✒️ डॉ. अनिकेत देशमुख यांचा वाढदिवस ‘प्रेरणा दिन’ म्हणून साजरा होणार
▪️ विविध उपक्रमांचे आयोजन
✒️ ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त गुरुवारी सांगोला नगरपरिषदेकडून ज्येष्ठांचा होणार सन्मान

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



