✒️ ठाकरेंचे 14 आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, लवकरच ऑपरेशन टायगर-4 होणार
▪️शिवसेना आमदाराच्या दाव्यानं खळबळ
✒️ मला भीती वाटतेय, गणपतीच्या दिवसात दंगली घडवल्या जातील
▪️मनसे पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरेंचं वक्तव्य
▪️म्हणाले, जो सुजाण हिंदू आहे, जो सुजाण मुस्लिम आहे, दोघांनाही सांगायचंय की सतर्क राहा
✒️ राज ठाकरेंच्या वक्तव्यावर महंत सुधीरदास पुजारींचा पलटवार, म्हणाले
▪️एका ज्येष्ठ नेत्याकडून असं वक्तव्य चुकीचं, कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंमध्ये गुंतून राहू नये
✒️ राज ठाकरेंचाही डीजेला विरोध, डॉल्बी अन् दहीहंडीत महिला नाचवण्यावरुन परखडपणे सुनावलं
▪️मनसेप्रमुख म्हणाले, ‘उत्तरेची संस्कृती इकडे कशाला आणताय?’
✒️ डीजे वाजणारच ! तो बंद करुन दाखवाच
▪️गुणरत्न सदावर्तेचं राज ठाकरेंना आव्हान, म्हणाले, कोणाला त्रास होत असेल तर मला कॉल करा

✒️ मुंबई महापालिकेतील ठाकरेंच्या शिवसेनेतील विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद रद्द
▪️नगरविकास विभागाची अधिसूचना, सोमवारी सभागृहात घोषणा
✒️ ‘भाजपवाले जसे आमचे लोक फोडतात, तसेच शिक्षकांनी इंग्रजी शाळांमधील पोरं फोडावी अन् मराठी शाळेत आणावी’
▪️मंत्री गुलाबराव पाटलांचा अजबच सल्ला
✒️ मनोज जरांगेंचं उपोषण सुरू असतानाच अंतरवालीत ओबीसींचंही आंदोलन
▪️2 सप्टेंबरचा GR रद्द करण्याची मागणी, आंदोलक म्हणाले, विश्वास नांगरे पाटील कुणबी दाखल्यानं आलेले आहेत
✒️ औषध निरीक्षक पेपरफुटीत सहभाग आढळल्यास आयोगातल्या व्यक्तीलाही कठोर शिक्षा होईल
▪️मुख्यमंत्री फडणवीसांचा विद्यार्थ्यांना शब्द
✒️ राज्यातील आश्रमशाळात 2 वर्षांत 590 हून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू
▪️कुटुंबाच्या हातावर 2 लाख टेकवतात
▪️अभिजित दिपकेंची खंत, म्हणाले, राजकारण्यांच्या पाळीव प्राण्यांवर यापेक्षा जास्त खर्च होतो
✒️ सोलापूर-मुंबई विमानसेवा पुन्हा बंद
▪️स्टार एअरचा मोठा निर्णय, विमानाच्या इंधनाचे वाढलेले दर अन् प्रवाशांच्या कमी प्रतिसादाचे कारण समोर

✒️ मुंबईत अक्षयकुमार स्टाईल बोगस रेड, व्यापाऱ्याकडे 1 कोटीची मागणी; अखेर खऱ्या पोलिसांची धाड, 6 जणांना बेड्या
✒️ ‘डीजे ‘विरोधात जनआक्रोश
▪️हजारो पुणेकर रस्त्यावर; विद्यानंद बापटांच्या भूमिकेला दिला जाहीर पाठिंबा
✒️ इस्रो खासगीकरणाबाबत स्पष्टीकरणाची मागणी
✒️ महाराष्ट्र स्वतंत्र डेटा सेंटर धोरण तयार करणार
✒️ जगाच्या नव्या नकाशावर भारताचा आक्षेप
▪️जम्मू-काश्मीर, लडाख भारताच्या अधिकृत नकाशानुसारच दाखवावे
✒️ आरोग्य मंत्र्यांचा ‘परफॉर्मन्स मंत्र’
▪️अधिकाऱ्यांना पुढची जबाबदारी कामगिरीनुसार नियुक्त्यांमध्येही गुणवत्तेला प्राधान्य
✒️ वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी ८ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश
▪️दुसऱ्या फेरीसाठी २६४५ रिक्त जागा उपलब्ध

✒️ ऑगस्टमध्ये एसटीच्या उत्पन्नात ६६ कोटींची वाढ
▪️प्रवाशांच्या मागणीनुसार फेऱ्या वाढविण्याचा सकारात्मक परिणाम
✒️ रशिया-युक्रेन युद्ध समाप्तीसाठी जोरदार प्रयत्न
▪️अमेरिकेचे दूत विटकॉफ, कुशनर युक्रेनमध्ये दाखल
✒️ ११ कंपन्या, ७ हजार कोटी !
▪️आयपीओ बाजारात चालू आठवड्यात निधी सज्जता
✒️ स्टेट बँकेत १२ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती
✒️ सात्विक-चिराग यांना जेतेपद
▪️अखेर तिसऱ्या प्रयत्नात चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्यात यशस्वी
✒️ धनगर समाजाच्या हक्कांसाठी आज सांगोल्यात आक्रोश मोर्चा
▪️तहसीलदारांना निवेदन देणार
✒️ सांगोला येथील जुना मेडशिंगी रोड परिसर बनला अपघाताचा हॉटस्पॉट
▪️विद्यार्थी, नागरिक अन् वाहनधारकांचा जीव टांगणीला
✒️ खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांची सामाजिक कार्यकर्ते शहाजी गडहिरे यांच्या घरी सदिच्छा भेट

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



