ठळक बातम्या – 30/09/2026

0

✒️ निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत विराट मोर्चा

▪️राज ठाकरे म्हणाले, सगळ्यांना आमंत्रण पण झेंडा अन् अजेंडा एकच, देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्याचा

✒️ ‘ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली

▪️अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर’ राहुल गांधींचा हल्लाबोल

✒️ मतचोरीवर बोलणारा मी एकटा सत्ताधारी पक्षाचा नेता

▪️माझ्या मतदारसंघात 50 हजार बोगस मतदार

▪️शिवसेना आमदार संजय गायकवाडांचं मोठं विधान

✒️ इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक

▪️ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार

▪️उद्धव ठाकरे ऑनलाईन उपस्थित राहणार

✒️ ‘ठाकरेंवर टीका करून तुमची पापं झाकली जाणार नाहीत’

▪️उदय सामंतांवर भास्कर जाधव संतापले, म्हणाले, कोकणातील तालुक्यांबाबत ‘मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार का?’

✒️ दुष्काळाच्या निकषांत न बसणाऱ्या तालुक्यांनाही मिळणार मदत

▪️देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळ बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या महत्त्वाच्या सूचना

✒️ नुकसानग्रस्त शेतीच्या पंचनाम्यावर शेतकऱ्याची स्वाक्षरी घेणं बंधनकारक

▪️कृषी विभागाकडून राज्यभरातील कृषी अधिकाऱ्यांना पत्र

✒️ माजी अग्निवीरांना शासकीय नोकरीत 10 टक्के समांतर आरक्षण

▪️कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 459 पदांना मंजुरी

▪️मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

✒️ निवडणुकांमध्ये ‘फिक्सिंग’

▪️राहुल गांधी, खर्गे यांचा ज्ञानेश कुमारांवर हल्लाबोल

▪️रस्त्यावर, संसदेतही संघर्ष सुरूच ठेवणार

▪️ काँग्रेस कार्यकारिणीत निर्धार

✒️ औषधांच्या दरवाढीवर ‘सर्वोच्च’ संताप

▪️’कॅन्सर’ औषधांच्या १० पट जास्त नफा कमावण्यावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे

✒️ नागपूरच्या गावात परवानगी नाकारल्याने अभिनेता सयाजी शिंदे संतापले

▪️वृक्ष लागवडीबाबत प्रश्न विचारताच वनविभाग खडबडून जागा, चूक मान्य करत वृक्षलागवडीसाठी दिली परवानगी

✒️ मनोज जरांगेंना आणखी एक झटका

▪️अंतरवालीतील ललिता तारख यांची पोलिसांत तक्रार

▪️जरांगे समर्थकांनी बदनामी केल्याचा आरोप, थेट शिंदे-फडणवीसांकडेच मदत मागितली

✒️ महाराष्ट्रासह ५ राज्यांना दुष्काळाचा विळखा

▪️केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांची माहिती

✒️ मुंबईतील अँटिलिया स्फोटकप्रकरणात तब्बल साडे पाच वर्षानंतर सचिन वाझेला जामीन मंजूर

▪️दीर्घ कारावासाचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

✒️ प्रत्यक्षदर्शीना जिवे मारण्याची धमकी

▪️केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपपत्रातून धक्कादायक खुलासे

✒️ शेअर बाजारातील घसरण कायम

✒️ नारीची बातच न्यारी

▪️नीरूची सुवर्ण किमया

▪️रिले शर्यतीत महिलांची सुवर्णदौड

✒️ १०व्या दिवशी पदकांचे अर्धशतक साकारले

✒️ गुलवीरला कांस्य; पदकांची हॅटट्रिक पूर्ण

✒️ विजयी आघाडीसाठी भारतीय संघ सज्ज

▪️विराटवर पुन्हा लक्ष

▪️आज दुसरा सामना

✒️ संस्कारांची ७५ वर्षे आणि तुकोबांच्या विचारांचा महाजागर

▪️सांगोला विद्यामंदिरमध्ये ऐतिहासिक महाग्रंथदान सोहळा संपन्न

✒️ माळरानावर फुलवली प्रयोगशील डाळिंब बाग

▪️इंडो-इस्रायल कृषी तज्ज्ञांकडून अशोक नरळे यांच्या शेतीचे कौतुक

✒️ ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची कामे गतीने पूर्ण करा – जिल्हाधिकारी

✒️ सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यांत दुष्काळ, १०० टक्के क्षेत्राचे पंचनामे ८ दिवसांत पूर्ण करा

✒️ “पाणी द्या, कारणं नको” सांगोल्याच्या पाणीप्रश्नावर मनसे आक्रमक; नगरपालिकेला तीव्र आंदोलनाचा इशारा !

▪️तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा लोकहिताच्या दृष्टीने आंदोलन करू : विठ्ठल शिंदे

✒️ आम. डॉ. बाबासाहेब देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे चारा छावण्या सुरू करण्याची मागणी

✒️ सांगोल्यात पिकअप चोरी; १ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल लंपास

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here