सांगोला नगरपालिकेतील विद्युत अभियंत्याच्या भ्रष्ट मनमानी कारभाराची चौकशी करून निलंबित करा; अन्यथा काँग्रेस पक्षाचा तीव्र आंदोलनाचा इशारा

0

सांगोला/प्रतिनिधी :सांगोला नगरपालिकेतील भ्रष्ट आणि मनमानी कारभार करणाऱ्या विद्युत अभियंत्याने गेल्या दोन वर्षांत विद्युत विभागांतर्गत केलेल्या कामांची आणि काढलेल्या बिलांची शासनाने समिती नेमून चौकशी करावी, तसेच त्यांना निलंबित करावे; अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, संबंधित विद्युत अभियंत्याने पदभार घेतल्यापासून ‘हम करे सो कायदा’ याप्रमाणे कामकाज सुरू केले आहे. कोणालाही विश्वासात न घेता मनमानीपणे कारभार सुरू असून, स्थानिक स्वराज्य संस्था ही नागरिकांची आहे याचे भान न ठेवता,

ती स्वतःची असल्यासारखे त्यांचे वर्तन आहे. जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या सूचनांना केराची टोपली दाखवली जात असून, प्रत्येक कामात ‘अर्थपूर्ण’ वाटाघाटी केल्या जात असल्याचा आरोप निवेदनात केला आहे.

यापूर्वी उभारण्यात आलेल्या विद्युत पोलचे काम अंदाजपत्रकाप्रमाणे झाले नसून, याला सर्वस्वी संबंधित अभियंत्याला जबाबदार धरावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, नगरपालिकेची विजेची बिले वेळेवर न भरल्यामुळे पालिकेला सुमारे ८ ते १० लाख रुपयांचा दंड आणि व्याजाचा नाहक भुर्दंड सोसावा लागला आहे. ही रक्कम संबंधित अभियंत्याकडून वसूल करावी आणि रक्कम वसूल न झाल्यास पालिकेच्या नुकसानीस जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

विद्युत अभियंत्याची खातेनिहाय चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करावे; अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here