सांगोला नगरपरिषदेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

0

सांगोला (प्रतिनिधी): आज १ मे, ‘महाराष्ट्र दिन’ आणि ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिना’निमित्त सांगोला नगरपरिषदेच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह प्रांगणात अत्यंत उत्साहात ध्वजारोहण सोहळा पार पडला.

लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री. आनंदा माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीताच्या सुरांमध्ये तिरंग्याला सलामी देण्यात आली. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

या मंगलप्रसंगी नगरपरिषदेचे  उपनगराध्यक्ष नितीन इंगोले आणि मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच नगरपरिषदेचे विविध पदाधिकारी, सदस्य ,नागरिक, माजी सैनिक, पत्रकार, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री. आनंदा माने यांनी सर्व सांगोला शहरवासीयांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी उपस्थित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व पदाधिकारी, सदस्य,माजी सैनिक, नागरिक व पत्रकार यांना दि. 1 मे ते 15 मे पर्यंत वेळेची बचत व अचूक माहिती नोंदविण्याच्या दृष्टीने आपल्या घरून स्वगणना कारण्याविषयी आवाहन केले.दरवर्षी प्रमाणे यावेळीही 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्त माजी सैनिक, वीर माता व वीर पत्नी यांचा सन्मान करण्यात आला. यासोबतच नगरपरिषदेच्या सफाई कर्मचारी बांधवांचाही कामगार दिनाच्या निमित्ताने सन्मान करण्यात आला.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here