सोलापूर जिल्ह्यातील आणि शहरातील नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी ‘वीर कोतवाल शिक्षण संस्थेच्या’वतीने भव्य गुणगौरव व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा शनिवार, दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता ‘शिव शंकर मंगल कार्यालय’ (११५/ब, बॉम्बे पार्क रोड, अक्षय सोसायटी, नवीन आय.एम.एस. शाळेजवळ, जुळे सोलापूर) येथे संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव केला जाणार असून, समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी एका विशेष मदत योजनेचा शुभारंभही केला जाणार आहे.
दहावी, बारावी मध्ये परीक्षेत ७०% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमधून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्यांना अनुक्रमे ३,००१/-, रु. २,५०१/- आणि रु. १,५०१/- रु.रोख, तसेच सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक वगळून ७०% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उर्वरित सर्व पात्र विद्यार्थ्यांना प्रत्येकी रु. ५००/- रोख बक्षीस दिले जाईल.

पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात ६०% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार होईल. इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा, एम.टी.एस. (MTS), एन.टी.एस. (NTS) आणि नवोदय परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचाही गौरव केला जाईल. इतर विविध क्षेत्रांत विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या समाजबांधवांचाही यात सन्मान करण्यात येईल.
सामाजिक बांधिलकी जपत वीर कोतवाल शिक्षण संस्थेने एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. नाभिक समाजातील ज्या कुटुंबातील पित्याचे छत्र हरवले आहे, अशा विस्थापित कुटुंबातील इयत्ता ५ वी ते १२ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे दानशूर व्यक्तींच्या मदतीने पालकत्व स्वीकारले जाणार आहे. या योजनेअंतर्गत अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून रुपये ३,०००/- चे अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे.

वरील सर्व निकषांमध्ये बसणाऱ्या सांगोला तालुक्यातील पात्र विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेच्या झेरॉक्स प्रतीच्या पाठीमागे स्वतःचे पूर्ण नाव, संपूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर लिहून, दि. ४ ऑगस्ट २०२६ पूर्वी श्री. संजय काळे गुरुजी– ८८०५९७१९३५, श्री. राधेश काळे – ७७५७९२९१०७ यांच्या क्रमांकांवर व्हॉट्सॲप करावेत किंवा प्रत्यक्ष जमा करावेत

“ज्या दानशूर व्यक्तींना या संस्थेस देणगी द्यायची आहे किंवा ‘दत्तक पालक योजने’ अंतर्गत एखाद्या विद्यार्थ्याचे पालकत्व स्वीकारायचे आहे, त्यांनी संस्थेच्या संचालकांशी संपर्क साधावा,” असे आवाहन जिल्हाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर रामचंद्र काळे यांनी केले आहे. समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा व सहकार्य करावे, अशी विनंती संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



