माढा महाविद्यालयातील एन. एस. एस. च्या विद्यार्थ्यांचा पूरग्रस्तांना मदतीचा हातभार

0

माढा: रयत शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय माढा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून पूरग्रस्तांसाठी मदत निधी गोळा करण्याचे कार्य उल्लेखनीय करण्यात आले. माढा महाविद्यालयातील एन.एस.एस.च्या विद्यार्थ्यांनी माढा शहरातील विविध मार्गावरील सर्वसामान्य व्यक्तींच्या कडून मानवतेच्या भावनेतून पूरग्रस्तांसाठी 52 हजार 163 रुपये निधी गोळा करण्यात आला.

या रकमेचा धनादेश पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर यांच्याकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील हेळकर व एन. एस. एस .चे कार्यक्रम अधिकारी डॉ.दत्तात्रय काळेल यांनी सुपूर्त केला. या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे चेअरमन मा. संजीव पाटील व आई प्रतिष्ठान सोलापूर चे मा. मोहन डांगरे पाटील , स्वेरी कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष मा. बी.पी. रोंगे , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक मा. डॉ. राजेंद्र वडजे तसेच विद्यापीठाच्या सिनेट सदस्य सुनंदा भगत इ. उपस्थित होते. या उपक्रमासाठी उपप्राचार्य प्रा. अशोक लोंढे एन.एस.एस. समिती मधील सदस्य डॉ.संतोष बाबरे, प्रा. संकल्प बारबोले, प्रा. समाधान कदम प्रा.श्रद्धां मस्के, व प्रा.सोमवती लंगोटे कार्यालयीन प्रमुख श्री .हनुमंत खपाले यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी निधी संकलन करण्यासाठी परिश्रम घेतले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here