विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीचे मूल्ये रुजवून लोकसहभाग वाढावा, त्यांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास दृढ व्हावा आणि निवडणूक साक्षरता व्हावी या उद्देशाने रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय मध्ये अभिरूप मतदान हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. राज्यशास्त्र विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने राबविलेल्या या उपक्रमांमध्ये महाविद्यालयातील 264 विद्यार्थ्यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी अभिरूप मतदान बूथ, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, पोलिंग एजंट, सुरक्षा रक्षक अशा विविध भूमिका विद्यार्थ्यांनी हुबेहूब साकारल्या.

मतदान करतेवेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींमध्ये मोठा उत्साह दिसून आला. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ. बाळासाहेब बलवंत यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या अभिरुप मतदान केंद्राला रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य श्री अमरजीत पाटील,संगमेश्वर कॉलेजचे प्राचार्य डॉ.ऋतुराज बुवा, राष्ट्रीय केमिकल लॅबोरेटरी पुणे येथील शास्त्रज्ञ डॉ. गजभिये, डॉ .अमर कांबळे, डॉ.समाधान माने, डॉ.रमेश शिंदे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुशील शिंदे, डॉ. दादासाहेब हाके, प्रा. रोहित गायकवाड, प्रा. सारिका मुळूक, प्रा. कांबळे यांनी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे वार्तांकन मास कम्युनिकेशन विभागातील विद्यार्थिनी यांनी केले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक


