प्रतिनिधी (शशिकांत कोळी): महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील प्रवर्गातील कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, डोंगर कोळी व ढोर कोळी घ्या समाज बांधवांना जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळण्याकरिता तसेच रक्त नात्यातील नातेवाईकांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळण्याकरिता महाराष्ट्र राज्याचे तात्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक पार पडली होती. सदरच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे अनेक मंत्री खासदार,आमदार, ॲडिशनल चीफ सेक्रेटरी, विभागाचे सेक्रेटरी, प्रशासनाचे अधिकारी व आदिवासी कोळी समाजाचे शिष्टमंडळ/ प्रतिनिधी यांचा समावेश होता.

बैठकीदरम्यान आदिवासी कोळी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर तसेच विविध जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या अन्नत्या उपोषणामध्ये, आंदोलनमध्ये होत असलेल्या जातीच्या दाखल्याची व जात प्रमाणपत्राची प्रामुख्याने चर्चा करून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आला.

मात्र, सदर बैठकीस जवळपास दोन वर्षाचा कालावधी उलटून जाऊन सुद्धा सदरच्या बैठकीचे/ इतिवृत्तचे अंमलबजावणी करण्यास सरकारकडून दिरंगाई होत असल्याने आदिवासी कोळी समाजामध्ये तीव्र नाराजीची भावना निर्माण झाली आहे. कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार श्री रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली या विषयाच्या सातत्याने पाठपुरवठा करण्यात येत असून दि. 20 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या बैठकीच्या निर्णयाची/इतिवृत्ताची तात्काळ अंमलबजावणी व्हावी व शासनाने आवश्यक ते परिपत्रक काढावे

याकरिता आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकाच वेळीस सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन व निवेदन देण्याकरता कोळी महासंघाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहिले आहेत. या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री यांना आदिवासी कोळी समाजाचे निवेदन आपल्या माध्यमातून सादर करावे अशी मागणी यावेळेस करण्यात आली.

जर येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये आदिवासी कोळी समाजाचा प्रश्न मार्गी न लावल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर माजी आमदार रमेशदादा पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली कोळी महासंघ हे तीव्र आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष ॲड.चेतन पाटील यांनी दिली त्यांच्यासोबत कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील कार्याध्यक्ष शंभू माने युवा जिल्हाध्यक्ष विश्वनाथ आप्पा प्याटी शहर अध्यक्ष अप्पासाहेब हिप्परगे नगरसेवक विशाल शिरसाट अक्कलकोट तालुकाप्रमुख ऋषी भाऊ लोणारी उपाध्यक्ष राजू कोळी नगरसेवक दादा कौलगी कोळी , शशिकांत कोळी पत्रकार , सिद्धनाथ माने पत्रकार, सोमनाथ माने , मंदार माने साईराम हाबिराव , आण्णा माने , दामोदर माने आप्पा कोळी नितीन कोळी बापू हाबिराव सुरेश माने संतोष माने हनुमंत कोळी गणपत माने नाथा जाधव उमेश करजगी महेश कोळी आनंद कोळी अंबादास करजगी दशरथ मुलीमनी स्वामीनाथ लोणारी देवेंद्र कोळी विक्रांत कोळी गुंडप्पा कोळी भीमा यांचेसह सर्व आदिवासी कोळी समाजातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



