रयतचे प्राध्यापक मा. दत्तात्रय काळेल यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

0

सांगोला (प्रतिनिधी): भारतीय स्वयंसेवी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय पुरस्कार सोहळा कार्यक्रमांमध्ये रयत शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय माढा येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रो.डॉ. दत्तात्रय मारुती काळेल यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुरस्कार 2026 नुकताच प्राप्त झाला आहे.

हा कार्यक्रम पुणे येथील पत्रकार भवन मध्ये आयोजित केला होता. सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथील अकॅडमीक कौन्सिलचे सदस्य डॉ. सुधाकर जाधवर, महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण विभागाचे माजी संचालक तथा कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, महाराष्ट्र राज्य प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष मा. प्राचार्य आबासाहेब देशमुख पुण्यातील नामवंत एडवोकेट प्रभाकर शेवाळे व लोणावळ्यातील रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष व समाजसेवक डॉ. धीरजलाल कल्याणजी तसेच संयोजक डॉ. गोरख साठे यांच्या शुभहस्ते डॉ. दत्तात्रय काळेल यांना पुरस्कार देण्यात आला.

याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मध्य विभागाचे चेअरमन मा.संजीव पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. घनश्याम हराळे तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. तसेच ग्रामीण भागामध्ये त्यांचे कौतुक होत आहे. त्यांना आतापर्यंत राज्यस्तरीय व राष्ट्रीय 12 पुरस्कार मिळालेले आहेत. डॉ. काळेल हे मूळचे खिलारवाडी ता. सांगोला येथील आहेत.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here