शिवभक्त जिवाजी महाले जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व तीन सायकलींची भेट

0

सांगोला (प्रतिनिधी) – शिवभक्त जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त आदर्श नाभिक समाज सेवा मंडळ व आपुलकी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वाढेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील १०१ विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच दूरवरून शाळेत पायी येणाऱ्या तीन गरजू विद्यार्थ्यांना सायकली भेट देण्यात आल्या.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला.वाढेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिवभक्त जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी कु. अनुष्का अशोक फरकांडे हिने जिवाजी महाले यांच्या कार्याविषयी भाषण करून उपस्थितांची वाहवा मिळवली.

 

या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली कलुबर्मे, उपशिक्षिका श्रीमती संगीता ठोकळे, उपशिक्षिका सौ. स्वाती घोंगडे, पदवीधर शिक्षक नवनाथ साळुंखे, पदवीधर शिक्षक हरिश्चंद्र लवटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष वसमळे, माजी अध्यक्ष प्रवीण हजारे, समिती सदस्य संतोष फरकांडे, अंगणवाडी सेविका श्रीमती सुनीता लोकरे उपस्थित होते.

तसेच आदर्श नाभिक समाज सेवा मंडळाचे तालुकाध्यक्ष साहेबराव जाधव, शहराध्यक्ष सुशील गवळी, उपाध्यक्ष शंकर खंडागळे, खजिनदार हनुमंत काळे, सिद्धेश्वर काळे, मनोज खंडागळे, समाधान सुरवसे, नितीन भोसले, तानाजी खंडागळे सर, सोमनाथ गवळी, गौरव काळे, अनिल काळे, संतोष चव्हाण, रामदास काळे, विनायक सागावकर, संतोष जगताप, तानाजी खंडागळे, संकेत माने, सूरज काळे, अजय चव्हाण, दगडू काळे तसेच आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर, अरविंद डोंबे गुरुजी, चंद्रशेखर कवडे व अमर कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here