सोलापूर जिल्ह्याच्या डिजिटल विश्वात शिवसेनेची प्रभावी मोर्चे बांधणी.!

0

जिल्हा कार्यकारिणी जाहीर; तब्बल २५८ शिलेदारांच्या खांद्यावर नव्याने जबाबदारी:- संपर्कप्रमुख अमित पाटील

सांगोला (प्रतिनिधी): शिवसेना पक्षाची धगधगती विचारधारा, ध्येयधोरणे आणि राज्य सरकारने घेतलेले जनहितकारी निर्णय तळागाळातील व शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेना सोशल मीडिया सोलापूर जिल्ह्याची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. याअंतर्गत जिल्हा पातळीपासून ते थेट पंचायत समिती गणप्रमुखांपर्यंत एकूण २५३ पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देऊन त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे व स्व. धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने, शिवसेचे शीर्षस्थ नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार या निवडी करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र राज्याच्या सोशल मीडिया उपराज्यप्रमुख प्रतिक शर्मा यांच्या तसेच पश्चिम महाराष्ट्र प्रमुख महादेव सलवदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सोशल मीडिया संपर्कप्रमुख अमित पाटील यांच्या नेतृत्वाखाली नव्याने अधिकृतपणे करण्यात आलेल्या निवडीची संख्या पुढील प्रमाणे.

जिल्हा संपर्कप्रमुख-१,सोलापूर लोकसभा प्रमुख- १,माढा लोकसभा प्रमुख -१,जिल्हाप्रमुख- १,जिल्हा समन्वयक -१,जिल्हा संघटक-१,सोलापूर शहर प्रमुख-१,तालुका प्रमुख-११, विधानसभा प्रमुख- ११,शहर प्रमुख-१४,तालुका व शहर समन्वयक- १३,जिल्हा परिषद गटप्रमुख-६८पंचायत समिती गणप्रमुख-१३६ असे एकूण २५३ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तर या मोहिमेचा एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यातील सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांचे अधिकृत नियुक्तीपत्रे काढून करण्यात आली असून शासनाच्या योजनांचा प्रचार-प्रसार करणे, पक्षाची भूमिका अधिकृतरीत्या मांडणे आणि डिजिटल माध्यमातून नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडणे हे या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे मुख्य ध्येय राहणार असून या व्यापक कार्यकारिणीमुळे सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचे सोशल मीडिया जाळे अधिक मजबूत होईल असा विश्वास यावेळी माध्यमांशी बोलताना संपर्कप्रमुख अमित पाटील यांनी व्यक्त केला.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here